Mumbai : सीएसटीकडे जाणाऱ्या रुळावर शॉक सर्किट; हार्बर वरील वाहतूक सेवा विस्कळित

Mumbai : सीएसटी कडे जाणाऱ्या रुळावर शॉक सर्किट झाल्याने हार्बर वरील वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा मोठा गोंधळ उडाला आहे. जुईनगर आणि नेरूळ स्थानकांच्या दरम्यान सीएसटी कडे जाणाऱ्या रुळावर शॉक सर्किट सारखा प्रकार घडला आहे, आणि त्यातून काही वेळासाठी मोठी आग लागली. त्यामुळे हार्बर वरील वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व गाड्या नेरूळ मध्येच ठप्प आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, ओव्हर हेड वायर तुटली असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अद्याप नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.

सीएसटी लेनची वायर तुटली आहे की खरकोपर लेनची ते अजून कळलं नाहीय, जर सीएस्टी लेनची वायर तुटली असेल तर काही तास गाड्या फक्त सीएसटी वाशी याच दरम्यान धावतील आणि खारकोपरची वायर तुटली असेल तर ती लाईन बंद राहील 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *