पुणे: महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजली जाणारी 'लालपरी' आता अधिक सक्षम आणि प्रवासीभिमुख होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांशी असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी 'आपली बस, आपली सेवा' हे विशेष अभियान १ मे २०२६ म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे 'आपली बस, आपली सेवा' अभियान?
राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. एसटी बसेसची संख्या वाढत असली तरी, प्रवासी संख्या आणि महसूल वाढवण्यासाठी प्रवाशांचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात येत आहे. याअंतर्गत सेवा सुधारण्यासोबतच प्रवासाला 'मानवी स्पर्श' देण्याचा प्रयत्न केला जाईल.
अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये:
१. माहितीचे आदानप्रदान: प्रवासादरम्यान चालक आणि वाहक प्रवाशांना मार्गाबद्दल आणि महत्त्वाच्या स्थानकांबद्दल माहिती देतील.
२. स्वच्छता आणि शिस्त: बसस्थानके आणि बसेसमध्ये स्वच्छता राखण्यावर विशेष भर दिला जाईल. प्रवाशांनाही यामध्ये सहभागी करून घेतले जाईल.
३. डिजिटल पेमेंटला चालना: प्रवाशांना ऑनलाइन आरक्षण आणि 'एनसीएमसी' (NCMC) स्मार्ट कार्डचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
४. पर्यायी व्यवस्था: तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणांमुळे बस रद्द झाल्यास प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने पर्यायी बसची सोय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
५. तक्रार निवारण: प्रवाशांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी एक विशेष प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.
प्रवाशांचा सन्मान हेच ध्येय:
"एसटी हा केवळ प्रवासाचा मार्ग नसून तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. प्रत्येक प्रवाशाला सन्मानपूर्वक आणि सुखद अनुभव देणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे," असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी नमूद केले. १ मे पासून सुरू होणारा हा उपक्रम एसटी आणि सामान्य जनता यांच्यातील विश्वासाचा नवा सेतू ठरेल, असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.
आता लालपरीच्या चाकांना केवळ वेग नाही, तर सेवेची आणि संवेदनशीलतेची नवी दिशा मिळणार आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



