अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली होती, ज्यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील पारंपरिक पॅनलविरुद्ध खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील पॅनल अशी थेट लढत पाहायला मिळाली. या २१ पैकी ११ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित १० जागांसाठी सोमवारी विक्रमी मतदान झाले होते. अहिल्यानगर येथील कल्याण रोडवरील मतमोजणी केंद्रावर आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर जाहीर झालेल्या निकालांनी राजकीय वर्टुळाचे लक्ष वेधून घेतले.
पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघात झालेली ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि अटीतटीची मानली जात होती. या मतदारसंघात एकूण १०४ मतदार होते. या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या लढतीत खासदार नीलेश लंके यांनी सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेत, विखे गटाचे समर्थक व प्रतिस्पर्धी उमेदवार राहुल शिंदे यांचा २३ मतांच्या फरकाने पराभव केला. खासदार नीलेश लंके यांनी दणदणीत विजय मिळवत जिल्हा बँकेच्या राजकारणात आपली धडाकेबाज एन्ट्री नोंदवली आहे. पारनेरच्या सहकार क्षेत्रात या विजयामुळे खासदार लंके यांनी आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, हा निकाल विरोधी गटासाठी आणि विशेषतः विखे फळीसाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
तसेच, पारनेरपाठोपाठ अत्यंत संवेदनशील ठरलेल्या अकोले सेवा सोसायटी मतदारसंघातही मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. या ठिकाणी अकोल्याचे विद्यमान आमदार किरण लहामटे यांना अनपेक्षित आणि मोठा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. अकोल्यात माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या कन्या ज्योती शिंदे यांनी विद्यमान आमदार किरण लहामटे यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणाची समीकरणे वेगाने बदलत असल्याचे स्पष्ट होत असून, या निकालांचे आगामी राजकीय पटलावर दूरगामी परिणाम होणार आहेत.
शहर
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
- नाशिक: सिंहस्थ ध्वजारोहणावर २० कोटींचा खर्च; अडीच कोटींचे हेलिपॅड उभारूनही व्हीआयपींनी रस्त्याने प्रवास केल्याने चर्चांना उधाण
- नाशिक: मालेगाव तालुक्याच्या घशाला पडली कोरड; १२५ गावे आणि ५८ वाड्यांना पाणीटंचाईची तीव्र धग
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: अभिमानास्पद क्षण! आचऱ्याच्या शिल्पा गावकर-डोंगरेची राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
- पुणे: पुण्यात विवाहितेची आत्महत्या; घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांकडून महर्षीनगर येथील 'झांबरे पॅलेस'ची तोडफोड, परिसरात तणाव
- सातारा: जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ९७.९२ टक्के चुरशीने मतदान! खंडाळ्यात तुफान राडा, उद्या निघणार निकाल
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा




























Subscribe to my channel




