सरसंघचालक मोहन भागवत, जाती अंत लढाईImage Credit source: गुगल
RSS Chief Mohan Bhagwat on Caste System: हिंदू धर्मात जातीची उतरंड आणि जातीभेद, पोटजाती, जाती व्यवस्था असे अनेक वाद आहेत. त्याविषयी टीका आणि नाराजी पाहायला मिळते. जाती व्यवस्था हा हिंदू धर्मातील प्रमुख घटक आहे. जातीअंताच्या लढाईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय असा प्रश्न कायम विचारल्या जातो. डावी चळवळ आणि पुरोगामी, अनुसूचित जाती संघटना, बहुजन समाजातून संघाला याविषयी कायम विचारणा होते. याविषयावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मन मोकळं केलं. त्यांनी या विषयावर संघाची भूमिका स्पष्ट केली.
अखंड भारताची इच्छा
2047 मध्ये भारताचं विभाजन होईल ही भीती बाळगण्यापेक्षा 2047मध्ये अखंड भारताची कल्पना करा. सुलतान, बादशाह 500 वर्ष राहिला, इंग्रजांना 200 वर्षात जमलं नाही ते आता कसं होईल. स्वतंत्र भारतात तर शक्यच नाही. आता हा 1947 पूर्वीचा भारत राहिला नाही. अखंड भारत होईल आणि करून दाखवू ही इच्छा मनात बाळगा. भारताचे तुकडे होईल असं काही लोक स्वप्न पाहत आहेत.ते पूर्ण होणार नाही, असे सरसंघचालकांनी ठणकावून सांगितलं.
हिंदू आणि शीख एकच होते. आजही रोटीबेटी व्यवहार होतातच. रक्ताचं नातं आहे. पूजा वेगळी आहे. धर्म म्हणून शीख वेगळे आहेत. त्यांच्या विशिष्टेला मान्यता दिली पाहिजे. पण समाज म्हणून आपण सर्व एक आहोत. हे सर्व धर्म एकाच स्वभावाचे आहेत. त्यामुळे आपल्या एकात्मता स्त्रोतात या सर्व धर्माचे नावे घेतो. श्रद्धापूर्वक त्यांचं हृद्यात धारण करतो. गुरू ग्रंथ साहिबात फक्त शीखांची वाणी आहे का. तर संपूर्ण भारताची वाणी आहे. शीख पंथ म्हणून आचार विचार वेगळे असू शकतात. पण समाज आणि राष्ट्र म्हणून ते कधी वेगळे नव्हते. काश्मीर पंडितांची सुरक्षा त्यांनीच केली आहे. त्यामुळे त्याचं स्मरण झालं पाहिजे. नवीन एकता आणण्याची गरज नाही. जुनीच एकता पुढे न्यायची आहे यावर सरसंघचालकांनी खास जोर दिला.
जातीअंतावर सरसंघचालकांचे विचार काय?
पुण्यात वसंत व्याख्यानमालेत बाळासाहेब देवरस यांचं भाषण झालं. त्यात संविधानातील सर्व आरक्षणाला समर्थन दिलं आहे. जातीयवाद जात नाही, तोपर्यंत आरक्षण राहिलं पाहिजे. जातीभेद दूर झाला असं ज्यांच्यावर जातीय अत्याचार झाले त्यांना वाटलं पाहिजे. आता भेद नाही. आता आरक्षणाची गरज नाही. असं आता सुरू झालं आहे. अनेकांनी आरक्षण सोडलं आहे. इतरांना दिलं आहे. जातीगत भेदभावाची सर्व कारणे गेली पाहिजे. आम्ही त्यावर ठोस भूमिका घेतली आहे, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.
व्यवस्था नियमाने दूर होणारी ही गोष्ट नाही. कायद्याने ही गोष्ट जाणार नाही. ही गोष्ट केवळ सदभावनेने दूर होईल. समाजात जे झालं ते गेलं. पण त्याचा परिणाम असा झाला की एक वर्ग खड्ड्यात आहे. ज्यांच्यासाठी आरक्षण आहे, ते खड्ड्यात आहे. जो मोठा आहे, त्याने आरक्षण घेतलं. जे खड्ड्यात पडलेले आहेत, त्यांना गुडघ्यावर उभं करून उचलंल पाहिजे. जे वर आहेत, त्यांनी खाली वाकून खड्ड्यातील लोकांना हात वर दिला आहे. २००० वर्षात ज्यांनी विषमता सोसली, त्यांना बाहेर आणण्यासाठी आपण २०० वर्ष सहन केलं तर काय झालं. आपलेच भाऊ आहेत. आपलाच देश आहे. प्राण थोडीच द्यायचे आहे. फक्त थोडंच सोडायचे आहे. त्यासाठी समजदारी पाहिजे. जे विषमतेचे दंश झेलत आहे, त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. नवीन पिढी म्हणते आम्ही केलं नाही. नवीन नियमाने प्रश्न निकाली निघत नाही हे सत्य आहे. त्यावर एकच उपाय म्हणजे दोघांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे. झगडा करू नये. काही घेतलं पाहिजे, काही सोडलं पाहिजे. त्यासाठी सदभावना ठेवली पाहिजे. समाजात फूट पडू नये. समजदारीने पुढे गेले पाहिजे. ही गोष्ट सर्वांमध्ये आली पाहिजे, असे विचार मोहन भागवत यांनी मांडला.
मला जात मिटवायची असेल तर सत्तेत येऊन मिटवली पाहिजे. समाजात जातीला थारा नाही असं कळल्यावर लोक जातीच्या नावाने मतदान मागणार नाही. जातीच्या नावाने मतमागणारे हे समतावादी नाहीत. ते मतवादी आहेत. त्यामुळे त्यावर सद्भावनाच उपया आहे. आपल्यासारख्या लोकांनी डोकं थंड ठेवलं पाहिजे. तरुणांनी आणि सोशल मीडियावरील लोकांनी शांत राहिलं पाहिजे.
जात नावाची व्यवस्था नाही. अव्यवस्था आहे. पूर्वी एक काम एक जात होती. आता तसं नाही. त्यामुळे जात पात आहे कुठे,. स्वार्थासाठी, राजकारणासाठी जात आहे. प्राण गेले, पण लाश घेऊन जात आहोत. जातीअंत होणं शक्य आहे. फक्त सद्भावनेचं परिवर्तन आलं पाहिजे. नंतर जातही जाईल, असा विश्वास सरसंघचालकांनी दाखवला.
[embedded content]
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel


