पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूच्या सेवनामुळे झालेल्या भीषण मृत्यूच्या सत्रामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी आणि पुण्यातील हडपसर-काळेपडळ भागात एकूण १८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, केमिकलयुक्त स्पिरिटचा वापर करून तयार केलेली घातक गावठी दारू फुगेवाडी आणि हडपसर परिसरात विक्रीसाठी पाठवण्यात आली होती. ही दारू पिल्याने नागरिकांना उलट्या आणि तीव्र पोटदुखीचा त्रास होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणावरून रोहित पवार यांनी संतप्त कार्यकर्त्यांसह हडपसरमधील संबंधित दारू विक्रीच्या अड्ड्यावर धडक दिली. त्यांनी स्वतः त्या अड्ड्याचे काऊंटर फोडले, तर कार्यकर्त्यांनी तेथील पत्रे उखडून टाकत संपूर्ण अड्डा उद्ध्वस्त केला. या घटनेप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, "पोलीस मुख्य सूत्रधार असलेल्या 'मोठ्या माशांना' वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत," असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, राज्य उत्पादन शुल्क विभागही तपास करत आहे.

शहर
- पुणे: पर्यटकांसाठी पावसाळी धोक्यामुळे प्रमुख किल्ले आणि धबधब्यांवर ३१ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी!
- मराठीची सक्ती डावलणाऱ्या शाळांना आता 'लाखाचा' दणका; नियम मोडल्यास होणार मान्यता रद्द
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
महाराष्ट्र
- मुंबई: नालासोपाऱ्यात पूर २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नागरिकांची धडपड ठरली निष्फळ
- पुणे: पर्यटकांसाठी पावसाळी धोक्यामुळे प्रमुख किल्ले आणि धबधब्यांवर ३१ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी!
- मराठीची सक्ती डावलणाऱ्या शाळांना आता 'लाखाचा' दणका; नियम मोडल्यास होणार मान्यता रद्द
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
गुन्हा
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- पश्चिम बंगाल: बारुईपूर १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा.
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!


























Subscribe to my channel


