कोल्हापूर जीएसटी विभागाची मोठी धडक! सिंगापूरस्थित 'तीन पत्ती मास्टर' ऑनलाईन गेमिंग कंपनीला ३६ कोटींची नोटीस; १९ कोटी रुपये जप्त!

केंद्रीय वस्तु आणि सेवा कर (GST) विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाकडील अधिकाऱ्यांनी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवर एक मोठी कारवाई केली आहे. सिंगापूर येथून चालवल्या जाणाऱ्या लोकप्रिय 'तीन पत्ती मास्टर' (Teen Patti Master) या ऑनलाइन गेमिंग ॲप कंपनीविरुद्ध मोठी कारवाई करत जीएसटी विभागाने तब्बल ३६ कोटी रुपयांची कर वसुली नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणी कठोर पावले उचलत कंपनीचे ११५ हून अधिक बँक खात्यांची कसून चौकशी केल्यानंतर तब्बल १९ कोटी रुपयांची रक्कम गोठवली (Freeze) आहे.

ऑनलाइन गेमिंग आणि जुगाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करणाऱ्या कंपन्यांकडून करचुकवेगिरी केली जात असल्याच्या संशयावरून जीएसटी गुप्तचर यंत्रणेने (DGGI) हा तपास हाती घेतला होता. या तपासणीदरम्यान सिंगापूरस्थित या गेमिंग ॲप कंपनीने भारतातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याचे आणि नियमानुसार कर भरला नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर यंत्रणेने तातडीने पावले उचलत कंपनीच्या विरोधात नोटीस जारी केली आणि आर्थिक खात्यांवर निर्बंध आणले. ऑनलाइन गेमिंगच्या क्षेत्रातील ही एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी कारवाई मानली जात असून, यामुळे करचुकवेगिरी करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *