नागपूर: सोने आणि चांदीमधील गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे तसेच शहरातील नामांकित बिल्डर्सशी व्यावसायिक ओळख करून देण्याचे प्रलोभन दाखवून, जरीपटका भागातील एका कंत्राटदाराला सायबर गुन्हेगारांनी तब्बल ३६ लाख रुपयांचा चुना लावल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी कथित पलाश सोनी आणि त्याचा साथीदार चिनू या दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, तक्रारदार शेख ताहिर हे जरीपटका परिसरात राहतात आणि ते बांधकाम साहित्याचा (कॉन्ट्रॅक्टर) पुरवठा करण्याचे काम करतात. गत ६ एप्रिल रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव पलाश सोनी असल्याचे सांगितले. आरोपीने तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी शहरातील मोठ्या आणि नामांकित बिल्डर्सशी त्यांची ओळख करून देण्याचे आणि त्या माध्यमातून व्यवसाय वाढवून देण्याचे आकर्षक आश्वासन दिले. यानंतर वेळोवेळी झालेल्या संवादात आरोपीने शेअर मार्केटमधील सोने व चांदी गुंतवणूक विभागात पैसे गुंतविल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगून त्यांना गुंतवणुकीसाठी उद्युक्त केले.
आरोपींच्या थापांना आणि गोड बोलण्याला भुलून तक्रारदाराने 'प्रीमियर ट्रेडिंग कंपनी'च्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली. आरोपींच्या आश्वासनांवर संपूर्ण विश्वास ठेवून तक्रारदाराने दोन वेगवेगळ्या आरटीजीएस (RTGS) व्यवहारांद्वारे एकूण ३६ लाख रुपये संबंधित आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यात जमा केले. मात्र, ही मोठी रक्कम जमा झाल्यानंतरही गुंतवणुकीवर कोणताही परतावा (नफा) मिळाला नाही आणि मूळ रक्कमही परत करण्यात आली नाही. जेव्हा तक्रारदाराने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली आणि कोणतीही समाधानकारक माहिती मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर तक्रारदाराने नागपूर सायबर पोलिसांकडे धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली.
या प्रकरqणी सायबर पोलिसांनी कथित पलाश सोनी आणि त्याचा साथीदार चिनू यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(३) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या (IT Act) कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलिस आता या संपूर्ण प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असून, फसवणुकीची रक्कम आरोपींकडून नेमक्या कोणत्या बँक खात्यांमध्ये वळविण्यात आली आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याबाबतचा सखोल तपास सायबर पोलिसांकडून केला जात आहे.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




