राज्यातील एमएचटी-सीईटी (MHT-CET) प्रवेश प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून, त्यामुळे शिक्षण क्षेत्रात आणि विद्यार्थी-पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी क्लासच्या चालकाचा आणि विद्यार्थ्याच्या पालकाचा हा संवाद असल्याचे सांगितले जात असून, यात पैशांच्या बदल्यात सीईटी परीक्षेत पर्सेंटाइल वाढवून देण्याचे आणि परीक्षा केंद्रांवर फेरफार (Manipulation) करण्याचे गंभीर आश्वासन दिल्याचे समोर आले आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिप आणि वादाची पार्श्वभूमी:
-
पर्सेंटाइल वाढवण्याचा दावा: व्हायरल झालेली ही ऑडिओ क्लिप आणि संबंधित व्हिडिओंमुळे प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. यापूर्वीही कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये १०० पर्सेंटाइल कसे मिळाले, यावरून राजकीय नेत्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आता या नवीन ऑडिओ क्लिपमुळे परीक्षा केंद्रांवर गैरव्यवहार होत असल्याच्या दाव्यांना बळ मिळाले आहे.
-
सीईटी सेलची सायबर पोलिसांत धाव: या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) मुंबईच्या सायबर सेल आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या क्लिप्स आणि व्हिडिओंमागील सत्यता तपासण्याची तसेच अफवा पसरवणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी सीईटी सेलने केली आहे.
-
प्रशासन आणि तज्ज्ञांचे स्पष्टीकरण: दुसरीकडे, बोर्डाचे गुण आणि प्रवेश परीक्षांचे (CET/JEE) स्वरूप पूर्णपणे वेगवेगळे असल्याने दोन्हीच्या गुणांमध्ये तफावत असणे स्वाभाविक आहे, असे स्पष्टीकरण यापूर्वीच सीईटी सेलच्या वतीने देण्यात आले आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व त्रुटीमुक्त असल्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी व्हायरल ऑडिओमुळं निर्माण झालेल्या संशयामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




