मुंबई: ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर मागील काही दिवसांपासून 'नॉट रिचेबल' असल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यासहित ६ खासदारांनी बंडखोरी केल्याच्या वृत्ताने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावरही ओमराजे निंबाळकर यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत खासदार ओमराजे निंबाळकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच, आता खुद्द ओमराजे निंबाळकर यांनी यावर अत्यंत महत्त्वाचं भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "मी सध्या मोठ्या धर्म संकटात आहे. इमोशनली (भावनिकदृष्ट्या) विचार केला तर हे पाऊल चुकीचे वाटते, पण पॉलिटिकल (राजकीय) दृष्टिकोनातून विचार केला तर हेच बरोबर आहे."
राजकीय अस्तित्व धोक्यात असल्याचा उद्वेग
ठाकरे गटात राहिल्यास राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अशी भीती व्यक्त करताना निंबाळकर म्हणाले, "खासदार असूनही जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतःची माणसं निवडून आणता येत नसतील, तर भविष्यात आपले राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते. मतदारसंघामध्ये रस्ते, पूल, डीपी यांसारखी महत्त्वाची कामे करण्यासाठी वारंवार प्रस्ताव देऊनही ती कामे होत नाहीत. सत्ता आणि निधी नसल्यामुळे सर्वसामान्यांची कामे करता येत नाहीत."
शिंदे सेनेत प्रवेश कधी?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, "शिंदे सेनेत प्रवेश करण्यासाठी माझ्यावर कार्यकर्त्यांचा आणि समर्थकांचा प्रचंड दबाव आहे. मात्र, माझे वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा अंतिम निकाल २० जून रोजी लागणार आहे. या निकालानंतर मी मतदारसंघातील माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी आणि लोकांशी सविस्तर चर्चा करूनच आपला अंतिम निर्णय जाहीर करेन."
पैशांचे आरोप पूर्णपणे खोटे
बंडखोरीसाठी किंवा पक्षांतरासाठी ५० कोटी किंवा १५ कोटी घेतल्याचा होत असलेल्या सर्व चर्चांचा त्यांनी तीव्र शब्दांत इन्कार केला. "पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या चर्चा आणि आरोप पूर्णपणे खोटे व अवाजवी आहेत. हा निर्णय मी पैशांसाठी घेतलेला नाही, तर केवळ माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी घेतला आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे यांच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष नाराजी
मुलाखतीदरम्यान ओमराजे यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये फिरतात आणि अफाट मेहनत घेतात. उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणांमुळे सतत फिरणे शक्य नसले, तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते आणि मैदानात उतरून काम करायला हवे होते."
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




