मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोडवर (Coastal Road) रविवारी (दि. २०) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव आलिशान बीएमडब्ल्यू (BMW) कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार पुलाच्या संरक्षक भिंतीला व रेलिंगला धडकून थेट ७५ फूट खाली एका अंडर-कन्स्ट्रक्शन पार्किंगच्या जागेवर कोसळली. या भीषण अपघातात तीन तरुण विद्यार्थ्यांचा जागीच व उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, पुढच्या सीटवर बसलेला एक तरुण मात्र चमत्कारीकरित्या बचावला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण मुंबईत मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हा अपघात रविवारी पहाटे ५ वाजून २० मिनिटांच्या सुमारास लोटस जेटीजवळ (लाला लजपतराय कॉलेजसमोर) घडला. कारमध्ये एकूण चार तरुण प्रवास करत होते. हे सर्व तरुण मूळचे अहमदाबादचे असून, ते मुंबईत जुहू येथील एनएमआयएमएस (NMIMS) आणि अन्य महाविद्यालयांत शिक्षणासाठी राहत होते. मरीन ड्राईव्ह परिसरावरून फेरफटका मारून हे तरुण बीएमडब्ल्यू कारमधून परतत असताना हा अपघात झाला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे समोर आले आहे की, अपघाताच्या वेळी कारचा वेग अतिशय भयानक म्हणजेच सुमारे १२० किलोमीटर प्रति तास एवढा जास्त होता. कोस्टल रोडच्या मुख्य रस्त्यावर ८५-८० किमी प्रति तास गतीची मर्यादा असतानाही अतिवेगात चालवल्या जाणाऱ्या या कारवरील चालकाचे वळणावर नियंत्रण सुटले. गाडी वेगात असल्याने ती पुलाचे कठडे तोडून थेट खाली कोसळली. या भीषण आपत्तीत २१ वर्षीय शमय गुज्जर (जो कार चालवत होता), १९ वर्षीय आदित्य जकासनिया आणि १७ वर्षांचा अल्पवयीन तरुण धैर्य शेठ यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
कारमधील इतर प्रवाशांसोबत पुढच्या सीटवर बसलेला २० वर्षीय आदित्य ओसवाल हा तरुण या भीषण अपघातातून दैवबलवत्तर म्हणून चमत्कारीकरित्या जीव वाचवून सुरक्षित बाहेर पडला. मात्र, त्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर नायर रुग्णालयात (Nair Hospital) अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबवले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, अतिवेगामुळे झालेल्या या दुर्घटनेने पुन्हा एकदा वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



