नाशिक: जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात नवरात्रोत्सवानिमित्त बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह भाविकांना एका भरधाव कारने जोरदार उडविल्याची अतिशय दुर्दैवी व भीषण घटना घडली आहे. या अपघातात नाशिक ग्रामीण पोलीस दलातील वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अन्य पोलीस कर्मचारी व अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि पोलीस दलात मोठी शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सध्या नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत राखण्यासाठी नांदुरी गावात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बॅरिकेडिंगही करण्यात आले होते. रविवारी मध्यरात्रीनंतर दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास नाशिकहून कळवणच्या दिशेने जाणारी एक भरधाव कार (क्रमांक MH 12 ML 7747) नांदुरी गावातील अभोणा टी-पॉइंटजवळ आली. या भरधाव कारने सर्वप्रथम एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. त्यानंतर नियंत्रण सुटलेली ही कार पुढे जाऊन नाशिकच्या दिशेने येणाऱ्या दुसऱ्या एका वाहनाला समोरून धडकली.
एवढेच नव्हे तर, रस्त्याच्या मधोमध वाहतूक नियंत्रणासाठी लावलेल्या पोलीस बॅरिकेड्सना चिरडत या कारने थेट बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि तेथे उपस्थित भाविकांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांच्या हनुवटीला, दोन्ही पायांना व छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात एपीआय दिनकर मुंडे यांच्या पायाच्या पंजाला दुखापत झाली असून हेड कॉन्स्टेबल सचिन राऊत यांच्यासह मुंबईहून दर्शन घेण्यासाठी आलेले महापे, मोरेश्वर बाळू पाटील, तेजस्वी पाटील, गोपाळ सोनवणे यांसह इतर ७ ते ८ भाविक व पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
सर्व जखमींना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काहींना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर परिसरात एकच तारांबळ व गोंधळ उडाला. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत कारचालकाला ताब्यात घेतले असून, चालक मद्यधुंद होता की अन्य काही कारणांमुळे त्याचे नियंत्रण सुटले, याचा सखोल तपास वणी व कळवण पोलीस करीत आहेत. नवरात्रीच्या पवित्र काळात ड्युटीवर असलेल्या पोलिसाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शहर
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
महाराष्ट्र
- शिरुर पोलिसांची धडक कारवाई; रेणुकामाता मंदिर परिसरात गावठी पिस्तूल व काडतुसासह आरोपी गजाआड!
- पुणे: पुण्यातील १५ ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळल्याने खळबळ; बॉम्बशोधक पथकाच्या कसून तपासणीनंतर अफवा असल्याचे स्पष्ट!
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!

























Subscribe to my channel




