महाराष्ट्र: २०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. या बंडाच्या काळातील अनेक नाट्यमय किस्से आजही राजकीय वर्तुळात चर्चिले जातात. अशीच एक खळबळजनक आठवण मंत्री संजय शिरसाट यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. "आम्ही सूरतला जात असताना एक आमदार अस्वस्थ होता. त्याला आमच्यासोबत यायचे नव्हते. अखेर आम्हीच म्हटले की त्याला जाऊ द्या, नाहीतर त्याच वेळी त्याचे 'राम नाम सत्य' झाले असते," असा मोठा दावा शिरसाट यांनी केला होता. या दाव्याने राजकारणात खळबळ उडाल्यानंतर आता यावर खुद्द धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी प्रतिक्रिया देत "तो आमदार मीच आहे," असे स्पष्ट केले आहे.
२०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडावेळी शिवसेनेचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे सुरत येथील टोल नाक्यावरुन परत आले होते. त्यांनी त्यावेळी मध्यरात्री एका गाडीला विनवणी करून मुंबईत परतल्याचा किस्सा स्वतः आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितला होता. यामुळे आता शिरसाट यांनी केलेला दावा हा आमदार कैलास पाटील यांच्याबाबत असल्याचे बोलले जात आहे.
"'तो आमदार मीच"
"संजय शिरसाट यांचे वक्तव्य मी ऐकले. शिवसेना फुटीवेळी मला त्यांच्याबरोबर जायचे नव्हते. मीच सूरतवरून पळून आलो. त्या वेळी काय काय झाले होते, हे मी अनेकदा सांगितले आहे. परंतु शिरसाटांच्या वक्तव्यानंतर तो प्रसंग पुन्हा चर्चेत आला आहे. शिरसाटांच्या दाव्यानुसार तो आमदार मीच आहे."
- आमदार कैलास पाटील
संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा?
एका मुलाखतीत २०२२ च्या बंडावेळचा प्रसंग सांगताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "एका आमदाराचा फोन आल्यानंतर आम्ही ठाण्याला गेलो आणि तिथून सर्वजण सूरतकडे निघालो. सूरतच्या आधी लागणाऱ्या एका टोलनाक्यावर वाहतूक कोंडीमुळे चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी तत्काळ तेथील पोलीस अधीक्षकांना फोन केला. 'गाड्या सोडू नका, असे मुख्यमंत्र्यांचे (उद्धव ठाकरे) आदेश आहेत,' असे त्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यावर 'पुढच्या काही मिनिटांत गाड्या सोडा, तुम्हाला मी सांगतोय,' असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितल्यानंतर वाहतूक कोंडी सोडवण्यात आली आणि आमचा ताफा पुढे निघाला."
पुढे बोलताना शिरसाट यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला की, "या सर्व घडामोडींदरम्यान एक आमदार खूप अस्वस्थ आणि बेचैन होता. त्याला आमच्यासोबत न येता मुंबईला परतायचे होते. बाहेर जोरदार पाऊस सुरू होता आणि आमच्या मोहिमेमुळे राजकीय वातावरणही तापले होते. जर त्या आमदाराला आम्ही त्यावेळी जाऊ दिले नसते, तर त्याच दिवशी त्याचे 'राम नाम सत्य' झाले असते."
शहर
- पुणे: महापालिकेचा सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा; पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकाने सील करण्याचा आयुक्तांचा इशारा!
- नवी मुंबई: आगीचा तांडव! सानपाड्यातील सप्तशृंगी ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; स्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नागपूर: कापसावरील आयात शुल्क २० टक्के करा, अन्यथा लक्ष्यित आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचा नागपुरातून सरकारला १५ दिवसांचा इशारा
महाराष्ट्र
- पुणे: 'एफडीए'चे २ दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ ठिकाणी छापे; १२ परवाने निलंबित, ५ आस्थापने बंद करण्याचे आदेश
- सोलापूर: पंढरपुरात हळहळ! बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; रात्रभर चालवलेली बचाव मोहीम अपयशी
- पुणे: महापालिकेचा सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा; पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकाने सील करण्याचा आयुक्तांचा इशारा!
- सिंधुदुर्ग: बस स्थानकातून एसटी पळवण्याचा प्रयत्न, कुंपण तोडून अर्धवट महामार्गावर आली बस; ४५ लिटर डिझेलही लंपास, दोडामार्गात खळबळ!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!
- गोवा: 'एनीव्हेअर रजिस्ट्रेशन' मुळे नागरिकांना मोठा लाभ! म्हापशातील नूतनीकृत बार्देश उपनिबंधक कार्यालयाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू




























Subscribe to my channel



