हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातून एक अतिशय सुन्न करणारी आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादाच्या भीषण उद्रेकातून एका डोकेफिरू पतीने आपल्या अवघ्या ४ महिन्यांच्या गर्भवती पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. एवढ्यावरच न थांबता, भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आलेल्या आपल्या सासूवरही त्याने जीवघेणा हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर घडलेल्या भीषण प्रकाराच्या पश्चात्तापातून किंवा अटकेच्या भीतीने पतीने स्वतः शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही थरारक घटना कळमनुरी तालुक्यातील खरवड येथील शेतशिवारात घडली असून, अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या संसाराचा असा भीषण आणि रक्तरंजित शेवटाने संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांकडून व प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, खरवड येथील रहिवासी प्रभाकर पाईकराव यांनी आपली २४ वर्षीय मुलगी दीपाली हिचा विवाह कळमनुरी तालुक्यातीलच धानोरा जहांगीर येथील रहिवासी विशाल डोंगरे (वय २७) याच्यासोबत लावून दिला होता. दीपालीचा हा पुनर्विवाह होता आणि तिची पहिल्या लग्नाची ४ वर्षांची मुलगी आजोबांकडे (आजोळी) राहत होती. लग्नानंतर दीपाली सासरी धानोरा जहांगीर येथे गुण्यागोविंदाने राहत होती. दरम्यान, पती विशाल डोंगरे याची तब्येत काही दिवसांपूर्वी बिघडल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
काही कारणास्तव दीपाली पतीला न सांगता किंवा त्याच्यासोबत न जाता परस्पर आपल्या खरवड येथील माहेरी निघून आली होती. आपल्यासोबत न येता परस्पर माहेरी आल्याचा तीव्र राग विशालच्या मनात खदखदत होता. याच रागातून विशाल पत्नीला परत आणण्यासाठी १४ ऑक्टोबरच्या दुपारी खरवड येथील तिच्या माहेरी शेतातील घरी पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर 'तू माझ्यासोबत न येता माहेरी का आलीस?' या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. सायंकाळच्या सुमारास हा कौटुंबिक वाद विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात विशालने जवळच पडलेला जुन्या बाजेचा लाकडी दांडा उचलून दीपालीच्या डोक्यावर, तोंडावर आणि पोटावर सपासप वार केले. ४ महिन्यांची गर्भवती असलेली दीपाली रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि गर्भातील जिवासह तिचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
आपल्या निष्पाप मुलीवर होत असलेला प्राणघातक हल्ला पाहून तिची आई कमलबाई पाईकराव या तिला वाचवण्यासाठी मध्ये धावून आल्या. परंतु, क्रोधाने आंधळा झालेल्या विशालने त्यांच्यावरही लाकडी दांडक्याने जबर प्रहार केले. डोक्यावर व हातावर गंभीर मार लागल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळल्या. दीपालीचे वडील प्रभाकर पाईकराव हे कामानिमित्त पाणी आणण्यासाठी गावात गेले होते. ते घरी परतले असता त्यांना घरात दीपाली मृत अवस्थेत आणि तिची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.
दरम्यान, पत्नीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच आरोपी विशाल डोंगरे याने घटनास्थळावरून पळ काढला आणि शेतातील एका सागाच्या झाडाला रुमालाच्या साहाय्याने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी सासूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, घटनेचा पुढील कायदेशीर तपास पोलीस करत आहेत.
शहर
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- पुणे: अशा घटना खपवून घेणार नाही; शिवाजीनगर कोर्टातील मंदार किवळे हल्ल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, पोलीस महासंचालकांना खडसावले!
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- सातारा: शेतीकडे केवळ व्यवसाय नव्हे, उद्योजकतेची संधी म्हणून पाहा; कराडच्या कृषी महोत्सवात सुनेत्रा पवार यांचे तरुणाईला आवाहन!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
गुन्हा
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
- अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!

























Subscribe to my channel




