उल्हासनगर: उल्हासनगरच्या कैलास नगर परिसरात भरदिवसा झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि नवे वळण समोर आले आहे. या गोळीबारात अनिल चौहान आणि अमन चौहान या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. या दुहेरी हत्येनंतर आता थेट स्थानिक पोलीस प्रशासनाच्याच भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच आमच्या घरातील दोन तरुण मुलांचे प्राण गेले, असा खळबळजनक आरोप मृतकांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हप्तेखोरी आणि खंडणीला विरोध ठरला कारणीभूत
मृतकांच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी शेखर बिराजदार, बलवीर बिराजदार, सागर पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी महिनाभरापूर्वी परिसरात टेम्पो चालवण्यासाठी १० हजार रुपयांची बेकायदेशीर खंडणी (हप्ता) मागितली होती. केवळ खंडणी मागून हे गुंड थांबले नाहीत, तर त्यांनी खंडणी न दिल्याने या मुलांना बेदम मारहाण देखील केली होती. हप्तेखोरी व दादागिरीला विरोध केल्याचा राग मनात धरून या टोळीने चौहान कुटुंबीयांना लक्ष केले होते.
तक्रार करूनही पोलिसांनी केले दुर्लक्ष
या मारहाणीनंतर पीडित कुटुंबाने ३० एप्रिल रोजी स्थानिक हिललाईन पोलीस ठाण्यात लेखी अर्ज आणि तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दखलपात्र गुन्हाही नोंदवला होता. मात्र, गुन्हा दाखल असूनही पोलिसांनी आरोपींना अटक करण्याचे पूर्णपणे टाळले आणि त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. "पोलिसांनी वेळीच कडक पावले उचलून आरोपींना जेलमध्ये टाकले असते, तर ते बाहेर मोकाट फिरले नसते आणि आज आमच्या दोन्ही मुलांची हत्या झाली नसती," असा उद्विग्न आणि आक्रमक सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
१० ते १२ जणांच्या टोळीकडून १० राउंड फायर
पोलिसांनी दाखवलेल्या याच ढिसाळ कारभाराचा फायदा घेत, गुरुवारी सायंकाळी १० ते १२ जणांच्या टोळीने दुचाकीवरून येत कैलास कॉलनी चौकात अनिल आणि अमन यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. आरोपींनी तब्बल १० राउंड फायर केले, ज्यामध्ये दोन्ही सख्ख्या भावांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आता वातावरण प्रचंड तापले असून, स्थानिक पोलिसांवर आमचा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडी (CID) किंवा सीबीआय (CBI) मार्फत करण्यात यावा, अशी आग्रही मागणी मृतकांच्या कुटुंबाने केली आहे.
शहर
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
महाराष्ट्र
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
- रत्नागिरी: जिल्ह्यातील सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करणार; पालकमंत्री उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!



























Subscribe to my channel




https://shorturl.fm/efpaK