सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातून एक खळबजनक बातमी समोर आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावातील एका शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात तब्बल एक कोटी पाच लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत संबंधित शेतकरी आणि त्याच्या मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत. अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी मलप्पा गुरबाळप्पा गड्डी ऊर्फ बिराजदार आणि त्यांची मुले सिद्धाराम बिराजदार (वय ३९) व श्रीकांत बिराजदार (वय ३०, सर्व रा. शेगाव, ता. अक्कलकोट) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी जेव्हा आळगे गावातील या उसाच्या शेतात छापा टाकला, तेव्हा तेथील दृश्य पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. उसाच्या पिकाच्या आड मोठ्या प्रमाणावर गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी शेतातून लाखो-कोटी रुपयांचा गांजा जप्त केल्यानंतर चौकशी सुरू केली. मात्र, या धक्कादायक प्रकारावर शेतकऱ्याने अत्यंत अजब आणि हैराण करणारा दावा केला आहे. शेतात गांजा कसा उगवला, यावर प्रतिक्रिया देताना शेतकरी म्हणाला की, आमच्या शेतात काम करण्यासाठी काही उसतोड कामगार आले होते. त्यांनी शेतात गांजा ओढला असावा आणि त्यानंतर ओढताना गांजाच्या बिया नकळतपणे शेतात खाली पडल्या, ज्यातून हे पीक आपोआप वाढले असावे, असा दावा आरोपी शेतकऱ्याने केला आहे. परंतु, पोलिसांचा प्राथमिक संशय आणि पुरावे पाहता ही केवळ दुर्लक्ष किंवा योगायोग नसून पद्धतशीरपणे गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचा दाट संशय आहे. या प्रकरणी पोलिस अधिक कसून चौकशी करत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
शहर
- अहिल्यानगर: लाखोंचा गल्ला...! प्रसिद्ध संदीप हॉटेलवर आयकर विभागाचे छापे; रात्रभर सुरु होती चौकशी...
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: लाखोंचा गल्ला...! प्रसिद्ध संदीप हॉटेलवर आयकर विभागाचे छापे; रात्रभर सुरु होती चौकशी...
- जालना: महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना जालन्यात भाजप नेत्यावर भजनात उधळल्या नोटा; संतापजनक प्रकारानंतर राजकीय वर्तुळात गदारोळ!
- महाराष्ट्र: राजकारणात मोठी खळबळ! शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची गुप्त बैठक; जयंत पाटीलही उपस्थित!
- सातारा: दुष्काळामुळे पशुखाद्याचा प्रश्न गंभिर; जिल्ह्यातून बाहेर चारा विक्री व वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त मनाई!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




