Pune Crime : पुण्यातील नव्या मुळशी पॅटर्नची राज्यात चर्चा; गोळीबार झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Pune Crime: पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागलीय. शहरातील मुळशी पॅटर्नची राज्यभरात चर्चा सुरू झालीय. दोन दिवसांपूर्वी येरवडा भागात झालेल्या गोळीबारात तरुण जखमी झाला होता. या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय. विकी राजू चंडालीया (वय ३१) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मुळशी पॅटर्ननुसार गोळीबार केल्यानंतर तरुणावर वार केल्याची घटना पुण्यातील २ दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणाची राहुल चंडालीया याने पोलिसात तक्रार दिलीय. तक्रारीनुसार येरवडा पोलिसांनी आकाश चंडालीया, अक्षय सतीश चंडालीया, अमन सतीश चंडालीया, अभिषेक शाम चंडालीया, संदेश संतोष चंडालीया, सुशांत प्रकाश कांबळे आणि संकेत तारू यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Pune Crime News : बुधवार पेठेतून चार बांगलादेशी महिला ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,"येरवडा येथील अग्रसेन शाळेसमोर विकी चंडालीया याचे व्हीआर ४ यु' नावाचे हॉटेल आहे. खुनाच्या गुन्ह्यात सहा महिन्यांपूर्वी येरवडा कारागृहातून आकाश चंडालीया जामिनावर बाहेर आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास आकाश चंडालीया हा त्याच्या भाऊ व साथीदारांसोबत विकीच्या हॉटेलमध्ये शिरले. आकाशने विकीकडे पुन्हा पैसे मागितले. विकी ने पैसे देण्यास नकार दिला.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *