
New Delhi : बांगलादेशमध्ये सरकारी नोकरीतील आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या विरोधात बांगलादेशातील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या आरक्षणाच्या विरोधात झालेल्या हिंसाचारत आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५०० हून अधिक आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांकडून बस आणि खासगी वाहनांची जाळपोळ सुरु आहे.
आरक्षणाच्या विरोधामुळे झालेल्या हिंसाचारात बांगलादेशात बस, ट्रेन आणि मेट्रो सेवा ठप्प झाली आहे. हिंसाचार रोखण्यासाठी सरकारने इंटरनेट बंद केलं आहे. कॉलेज, प्राथनास्थळे बंद करण्यात आली आहे. पूर्ण देशभरात हिंसाचार नियंत्रणात आणण्याासाठी मोठ्या प्रमाणात सैनिकांना रस्त्यावर उतरवण्यात आलं आहे.
|
|
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सरकारच्या नॅशनल टेलीव्हिजनवर देशाला संबोधित केलं. या निवेदनात पंतप्रधान हसीना यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. मात्र, पंतप्रधान हसीना यांच्या आवाहनानंतर आंदोलनकर्ते आणखी आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारी टेलिव्हिजनचं कार्यालयलाच आग लावली. या कार्यालयात अनेक पत्रकारांसहित १२०० कर्मचारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने मोठ्या शिताफीने त्यांचा बचाव केला.
आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी रबरच्या गोळ्या आणि अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. यात अनेक आंदोलकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. तेथील अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. ढाका आणि संपूर्ण देशातील बस सेवा बंद करण्यात आली आहे. ढाकाच्या गबटोली आणि सईदाबाद बस टर्मिनलवरील कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या बस न चालवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ढाका टाइम्सच्या रिपोर्टनुसार, त्याच्या एका पत्रकाराचा ढाका येथील हिंसाचाराचं वृत्तांकन करताना मृत्यू झाला आहे. आंदोलनकर्त्यांनी ढाकामध्ये कनाडा विद्यापीठात संकुलात आंदोलन केलं. यावेळी विद्यापीठाच्या छतावर ६० पोलीस कर्मचारी अकडले होते. त्यांचा हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव करण्यात आला आहे.
बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाला विरोध करत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. यामुळे देशातील अनेक भागात हिंसाचार सुर आहे. या हिंसाराच्या घटनेमुळे शाळा, महाविद्यालये, कार्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावास सतर्क झाले आहे. दूतावासाने बांगलादेशातील भारतीयांसाठी अॅडव्हायझरी जारी केली आहे. भारतीयांनी अनावश्यक प्रवास करू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहे. तसेच भारतीयांनी बांगलादेशात कोणताही प्रवास टाळावा, असे सल्लागार सूचनेत म्हटलं आहे. दूतावासाने हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे.
बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या कुटुंबातील सदस्यांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देऊ नये, अशी मागणी केली जात आहे. मात्र पंतप्रधान शेख हसीना यांनी आरक्षण संपवण्यास स्पष्ट नकार दिलाय. त्यावरून या देशात आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




