
Akola News : विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुण्यात वाढती गुन्हेगारी, अपघातांचे सत्र, आणि नव्याने पुन्हा चर्चेत आलेले ड्रग्ज प्रकरण राज्यासह देशात गाजत आहे. अशातच पुण्यातील सर्वात व्यस्त रस्त्यांपैकी एक असलेल्या एफ सी रोडवरील लिक्विड लेझर लाउंज या पबमधे ड्रग्ज घेतलं जात असल्याचं उघड झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे राज्याचे राजकारण देखील ढवळून निघाले आहे. अशातच या प्रकरणामुळे राज्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून इतर शहरात देखील असे प्रकार तर सुरू नाही ना? याचा शोध पोलीस घेत आहे. मात्र अकोल्यात एक वेगळी बातमी समोर आली आहे. यात जिल्ह्यातील सर्व बार चालक मालकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई विरोधात आक्रमक पवित्रा घेत अकोला शहरातील सर्व बार आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
उत्पादन शुल्क विभागानंच बार चालवावेत
अकोल्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आज बार मालकांनी ठिय्या आंदोलन केलंय. राज्य उत्पादन शुल्क विभागानं कालपासून शहरातील बारवर काही कारण नसताना हेतुपुरस्सर कारवाई सुरू केल्याचा आरोप बार मालकांनी केलाय. यासोबतच अकोल्यातील खाजगी हॉटेल आणि धाब्यांवर सुरू असलेल्या अवैध मद्य विक्रीकडे उत्पादन शुल्क विभागानं जाणीवपूर्क दुर्लक्ष केल्याचा आरोपही अकोल्यातील बार मालकांनी केलाय. उत्पादन शुल्क विभागाच्या या धोरणाविरोधात अकोला शहरातील सर्व बार आज बंद असणार आहेत. तर बारमालकांनी बारच्या चाव्या उत्पादन शुल्क विभागाकडे जमा केल्या आहेत. आता उत्पादन शुल्क विभागानंच बार चालवावेत, असा पवित्रा मालकांनी घेतलाय.
|
Crime News : साध्या भोळ्या कोकणी माणसांना फसविणा-या जळगावमधील भोंदूबाबाला चिपळूणमध्ये अटक |
संतप्त बार मालकांचे कार्यालयातच ठिय्या आंदोलन
अकोल्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आज संतप्त बार मालकांनी ठिय्या आंदोलन केलंय. यावेळी मोठ्या प्रमाणात बार मालक उपस्थित होते. त्यामुळे या कार्यालयात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी घटनास्थळ गाठत बार मालकांची समजूत काढली. मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई विरोधात बार मालकांनी आपला रोष व्यक्त करत प्रशासनाने या विषयाची दखल घ्यावी, अशी मागणीही आकोल्यातील बार मालक असोसिएशनने केलीय.
शहर
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
महाराष्ट्र
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- कोल्हापूर: निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप; आमदार सतेज पाटील यांचा मोठा दावा!
- जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!




























Subscribe to my channel




