
Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे एक एक कारनामे समोर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पुण्यातून त्यांची बदली वाशिम येथे करण्यात आली. त्यानंतर आता पूजा खेडकर यांचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडून मागवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पूजा खेडकर यांचा अहवाल मागवला आहे. लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने महाराष्ट्र सरकारकडून पूजा खेडकर यांच्याबद्दल अहवाल मागवला आहे. LBSNAA अहवाल तपासून अंतिम रिपोर्ट यूपीएससी यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. आयएएस होण्यासाठी आपण अंशतः अंध असल्याचे प्रमाणपत्र पूजा खेडकर यांनी दिले होते. त्यांनी पोस्ट मिळवण्यासाठी बनावट ओबीसी जात प्रमाणपत्र दिल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
|
|
पूजा खेडकर यांचे एकएक कारनामे समोर येताच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून तडकाफडकी त्यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी आयएएस म्हणून बदली करण्यात आली. आज पूजा खेडकर या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या. त्यांनी जिल्हाधिकारी एस. बुवनेश्वरी यांची भेट घेतली. मीडियातून होत असलेल्या आरोपावर मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी आरोपाबद्दल बोलण्यासाठी मी ऑथराईज नसल्याचे स्पष्टीकरण दिले. वाशिममध्ये रुजू झाल्याचा आनंद आहे. पुढील वर्षभर काम करत राहील असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, पूजा खेडकर या २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असताना प्रोबेशनरी आयएएस म्हणून काम करत असताना पूजा खेडकरने आपल्या खासगी अलिशान ऑडी गाडीवर लाल दिवा लावला होता. तसंच त्यांनी स्वतंत्र केबिन, शिपाई आणि ड्रायव्हरसाठीही हट्ट केला होता. त्याबरोबरच त्यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी अधिकाऱ्यांना दमबाजी केली. यामुळे पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी पूजा खेडकरचा प्रोबेशन काळ संपवून त्यांना दुसरीकडे बदली देण्याची मागणी केली होती.
या घटनेनंतर पूजा खेडकरचे एक एक कारनामे समोर यायला सुरुवात झाली. पूजा खेडकर यांना १७ कोटींच्या मालमत्तेतून ४२ लाखांचं उत्पन्न मिळतं. तर वडीलांच्या नावावर ४० कोटींची मालमत्ता आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून युपीएससीला अर्ज भरताना ८ लाख रुपयांची नॉन क्रिमीलेअर मर्यादा असतानाही कोट्यावधींची संपत्ती असलेल्या पूजा खेडकर यांना चुकीची माहिती देऊन आयएएस पदी नियुक्त्ती मिळाल्याची माहिती समोर आली आहे. आता तर थेट पंतप्रधान कार्यालयातून पूजा खेडकर यांचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडणीत वाढ झाली आहे.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!































Subscribe to my channel




