काही दशकांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या चुलत भावाचे लग्न होते. आमच्या पिढीतील हे पहिले लग्न होते. आम्ही चुलत भावंडे इतके उत्साहित होतो की आम्ही मद्रास (आता चेन्नई) मध्ये जमलो आणि तयारीला लागलो. पण नेहमीच आनंदी राहणारी चुलत बहीण अचानक आम्हाला टाळायला लागली. वास्तविक तिचे लग्न पाच दिवसांवर येऊन ठेपले होते. ती नेहमीच तिचा फोन घेऊन तिच्या बंद खोलीत बसायची. तू प्रेमात पडली आहेस, असे आम्ही तिला चिडवू लागलो. ती काहीशी रागात आणि लाजेने प्रतिक्रिया द्यायची. पण आजोबांनी आम्हाला एक वेगळीच गोष्ट सांगितली. तेव्हा आम्हाला समजले की आमचा गैरसमज झाला आहे. ते म्हणाले, तिला वेदना होत आहेत. तिला त्रास देऊ नका. ती तिच्या जुन्या शाळेतील ट्रॉफी आणि फोटो अल्बमची क्रमवारी लावत आहे. ती तिच्या नवीन घरासाठी काही सुटकेसमध्ये ते सगळे बसवू शकत नाही. तुम्ही तिला त्रास देऊ नका. जा आणि तिला पॅक करण्यास मदत करा. शिवाय तिच्या आई-वडिलांना सोडून नवीन जोडीदार शोधण्यातही तिचा संघर्ष सुरू आहे. त्या दिवशी आजोबांनी जबाबदारी घेतली. मी माझ्या भावंडांत सर्वात मोठा असल्याने त्यांनी मला त्यांच्यासोबत नेले. तिच्या खोलीत गेलो. ते तिच्याशी तासभर बोलले. त्यांनी सुंदरपणे समजावून सांगितले की ती आता आपल्या कुटुंबात नवीन सदस्य जोडत आहे. ते म्हणाले, “एखाद्या नवीन व्यक्तीशी लग्न करणे म्हणजे पालक गमावणे नाही तर एका संरक्षित मुलीची भूमिका ओलांडून दोन्ही कुटुंबांची काळजी घेऊ शकणारी जोडीदार बनणे. मी त्यांच्या संभाषणाची शेवटची ओळ कधीही विसरणार नाही. ते म्हणाले, “लग्न म्हणजे फक्त एक नवीन व्यक्ती शोधणे नाही तर ते जुन्या व्यक्तींना सोडून देणेदेखील आहे. उदाहरणार्थ- मी किंवा दुसरे कुणी किंवा अगदी जुने शाळेचे अल्बम. माझ्या बहिणीने त्यांचे सगले एेकले. मग आजोबांना मिठी मारली आणि तिला रडू कोसळले. आजोबांनी तिला पाच मिनिटे मोकळेपणाने रडू दिले. त्याच दिवशी मला तिच्यात अचानक बदल दिसला. तिच्या सगळ्या वस्तू आता फक्त दोन सुटकेसपुरत्या मर्यादित होत्या. त्याच संध्याकाळी ती हसत आणि खेळत परतली. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या आजोबांचा तो सखोल सल्ला दशकांनंतर माझ्या मदतीला आला. मी माझ्या मुलीला त्याच परिस्थितीत पाहिले. तेव्हा तो उपयोगी आला. माझी मुलगी तिचा लग्नाचा पोशाख निवडू शकत नव्हती. तेव्हा मी तिलाही तेच म्हटले. ती अनेकदा तिच्या आईसोबत बुटीकमध्ये जायची. सुंदर लेहेंगा पाहायची आणि रिकाम्या हाताने परतायची. तिला निळ्या रंगाचा योग्य रंग सापडत नाही, अशी तक्रार करायची. 10 फेब्रुवारी रोजी प्रकाशित झालेल्या “लव्हज लेबर हाऊ टू ब्रेक अँड मेक द बॉन्ड्स ऑफ लव्ह’ या पुस्तकातील चांगल्या लग्नाबद्दलची उत्कृष्ट माहिती वाचल्यावर मला ही घटना आठवली. त्यात प्रसिद्ध मनोविश्लेषक आणि लेखक स्टीफन ग्रोझ यांनी “सोफी” च्या मध्यवर्ती पात्राभोवती प्रेम, लग्न, समज आणि गैरसमज यांच्या विविध पैलूंचा शोध घेतला आहे. आपण ऐकायला शिकतो तेव्हा आपले नाते आपल्याला काय शिकवू शकते, हे त्यांनी त्यात मांडले. रुग्णांशी 40 वर्षांहून अधिक काळ झालेल्या संभाषण-संवादावर आधारे ते ही बाब स्पष्ट करतात. ते पाश्चात्त्य जगातून आले असल्याने विवाहांमध्ये अनेकदा अस्थिरता आणि घटस्फोटाचा अनुभव येतो. आपण आपल्या जोडीदारांचे ऐकायला शिकतो तेव्हा नाते काही गोष्टी शिकवू शकते. उदाहरणार्थ- पती अचानक त्याच्या कामाचा आनंद घेऊ लागतो तेव्हा जोडप्यांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. ग्रोझ सल्ला देतो की कामावरील या नवीन प्रेमाबद्दल भांडण्याऐवजी दोन्ही भागीदारांनी ते बोलून दाखवावे. कारण “रोमान्स देखील काम आहे आणि त्यासाठी दोघांनाही कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे.’
फंडा असा की, प्रेमातील श्रम हे आयुष्यभराचे काम आहे. आपण एकमेकांचे अधिक ऐकतो तेव्हा त्याचे फळ आणखी गोड होते. कधीकधी आपण आपल्या उणिवांकडेही लक्ष दिले पाहिजे. कारण यामुळे अनेकदा नवीन मार्ग मिळू शकतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




