पेपरफुटी आणि भ्रष्ट व्यवस्थेविरोधात ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आक्रमक एल्गार; सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका

पुणे: "मागील पिढ्यांनी रक्ताचे पाणी करून आणि तीव्र संघर्ष करत देशातील विद्यापीठांची दारे दलित, शोषित व वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी खुली केली आहेत. ही दारे कायमस्वरूपी खुली राहिली पाहिजेत, ही आपल्या सर्वांची महत्त्वाची जबाबदारी आहे. आमचा हा लढा केवळ पेपरफुटीच्या गैरप्रकाराविरोधात नाही, तर सर्वसामान्यांच्या मुलांची स्वप्ने पद्धतशीरपणे पायदळी तुडवणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धचा एक मोठा एल्गार आहे," अशा शब्दांत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (आयसा) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी सत्ताधारी आणि भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेवर कडाडून हल्लाबोल केला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात ‘आयसा’च्या वतीने देशातील वाढती बेरोजगारी, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना आणि ढासळत चाललेली शिक्षण व्यवस्था याविरुद्ध एक तीव्र निषेध आंदोलन पुण्यात पार पडले. या आंदोलनादरम्यान विद्यापीठ प्रशासनाच्या आणि शासनाच्या धोरणांवर विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रोष व्यक्त केला.

देशभरात आणि विविध राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटणे, भरती प्रक्रियेत होणारे गैरव्यवहार आणि त्यामुळे लाखो होतकरू विद्यार्थ्यांचे वाया जाणारे बहुमूल्य वर्ष या गंभीर मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. शिक्षण व्यवस्थेचे वेगाने होत असलेले खाजगीकरण आणि व्यावसायिककरण यामुळे ग्रामीण व गरीब भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. जोपर्यंत परीक्षा प्रणाली पूर्णपणे पारदर्शक होत नाही आणि पेपरफुटीच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असा इशारा यावेळी विद्यार्थी नेत्यांनी दिला.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *