
Amravati News : अमरावती खासदार कार्यालय कुलूप तोड प्रकरण आता चांगलंच तापल्याचं दिसत आहे. याप्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यात काँग्रेस नेत्या आणिआमदार यशोमती ठाकूर यांच्यासह नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचाही समावेश आहे. दरम्यान, काँग्रेसनं ताब्यात घेतलेलं अमरावती खासदार कार्यालय आता जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा सील करण्यात आलं आहे. आता पुन्हा कार्यालय सील केल्यानं नव्यानं वाद पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना, आमचा खासदार मागासवर्गीय आहे म्हणून त्यांना अशी वागवणूक दिल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. शिवाय या कट-कारस्थानमागे भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे आणि आमदार रवी राणा यांचा हात असल्याचाही आरोप त्यांनी केलाय.
आमचा खासदार मागासवर्गीय,म्हणून ही वागवणूक
लोकसभा निवडणुकीचा निकाल हा 4 जूनला लागला. त्यानंतर खासदार कार्यालय संबंधित पत्र संबंधित विभागाला देण्यात आले होते. मात्र असे असताना देखील त्यात वारंवार दिरंगाई होताना दिसत होती. त्यानंतर याबाबत पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना देखील याबद्दल विनंती करण्यात आली. मात्र, जिल्ह्यातले इतर प्रश्न ज्याप्रमाणे सोडवू शकत नाही, त्याचप्रमाणे त्यांनी हा ही प्रश्न सोडवला नाही. एखादा समजदार पालकमंत्री असता तर त्यानी वेळीच हा प्रश्न मार्गी लावून हा विषय संपवला असता.
|
|
मात्र, असे न होता त्यांनी अतिशय खालच्या पद्धतीने वागणूक आम्हाला दिली. आमचा खासदार हा एक मागासवर्गीय समाजाचा आहे. म्हणून मीटिंगमध्ये देखील त्यांना तिसऱ्या ठिकाणी बसवतात. आल्यावर त्यांना खुर्चीही मिळत नाही. खासदार बळवंत वानखडे यांना उभं राहावं लागतं. अतिशय अपमानास्पद वागणूक त्यांना दिली जाते. शिवाय या कट-कारस्थानमागे आमदार रवी राणा आणि अनिल बोंडे हे या मागचे सूत्रधार आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
तर त्यालाही उत्तर दिलेच पाहिजे- यशोमती ठाकूर
अमरावतीतील खासदार कार्यालय हे नवनिर्वाचित खासदारांना देण्यात यावं, असा 2015 मध्ये निर्णय झाला होता. यासंबंधीत जी काही नियमावली काढली होती त्यानुसार वर्धा आणि अमरावती येथील दोन खासदारांसाठी राखीव आहे. मात्,र अद्याप तरी असे झालेले नाही. परिणामी, वारंवार निवेदन आणि तक्रारी करून देखील आम्हाला न्याय मिळत नसेल तर लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे. कालचे जे पाऊल होते ते आम्ही उचलले आणि न्याय मागितला. त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केले त्याची आम्हाला परवा नाही.
मात्र केवळ सर्वधर्म समभाव या विचारांची, काँग्रेसची लोक त्या ठिकाणी बसली नाही पाहिजे या विचारतून हे कृत्य झाले आहे. मात्र या गोष्टीला आम्ही घाबरत नाही. आज राज्यात तुमची सत्ता आहे. उद्या आमची सत्ता येईल. इथून पुढे पण भरपूर काम करायची आहे. मात्र या कामात जर अशा पद्धतीने अडथळे निर्माण केले जात असतील तर त्यालाही उत्तर दिलेच पाहिजे. असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
शहर
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
महाराष्ट्र
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
गुन्हा
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
























Subscribe to my channel




