संपूर्ण जगभरात आज व्हॅलेन्टाईन डे साजरा केला जात आहे. अशातच आज उत्तर प्रदेशातील नोएडा येथे धक्कादायक घटना घडली. सेक्टर 107 जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारमध्ये एका जोडप्याचा मृतदेह आढळून आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कारच्या पुढच्या सीटवर हे दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले. या दोघांनाही गोळ्या घालण्यात आल्याचेही समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काय घडलं?
शनिवारी (14 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सेक्टर 107 जवळ रस्त्याच्या कडेला एक कार बराच वेळ उभी होती. ही कार पाहून स्थानिकांना संशय आला. काही लोक या कारच्या जवळ गेले तेव्हा त्यांना समोरच्या सीटवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले एक जोडपे पहायला मिळाले. यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. यानंतर सेक्टर 39 पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी कारचा दरवाजा उघडला आणि दोघांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झालेला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील मृत तरुणाचे नाव सुमित असून तो दिल्लीच्या त्रिलोकपुरी भागातील रहिवासी आहे. तसेच या घटनेतील तरुणीचे नाव रेखा असे असून ती नोएडातील सेक्टर 58 येथील रहिवासी आहे. हे दोघे एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत होत आणि या दोघांमध्ये प्रेम प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे.
पोलिस अधिकारी काय म्हणाले?
पोलिस अधिकारी प्रवीण कुमार म्हणाले की, प्रथमदर्शनी हे प्रकरण प्रेमप्रकरण असल्याचे दिसत आहे. दोघांनी एकमेकांवर गोळी झाडून आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे, मात्र याबाबत स्पष्टता नाही. यामागे तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग असू शकतो का याचाही पोलिस तपास करत आहेत.
पिस्तूल आणि काडतुसे जप्त
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली होती. टीमने कार आणि आजूबाजूच्या परिसरातून पुरावे गोळा केले. या ठिकाणी एक पिस्तूल आणि काही काडतुसे देखील आढळून आली. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. पोलिसांनी मृतांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली आहे आणि त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




