बलराज संघई यांचा कॉलम:राखाडी-करडा रंग: नश्वरता, वैराग्य आणि मुक्तीचा संदेश

शारदीय नवरात्र उत्सवातील करड्या (राखाडी) रंगाचा संबंध देवी चंद्रघंटा (काही पंचांगानुसार तिसऱ्या किंवा विशिष्ट दिवसाच्या क्रमाने) किंवा माता कालरात्री देवीशी जोडला जातो. करडा किंवा राखाडी रंग हा समतोल, संयम आणि धैर्याचे प्रतीक मानला जातो. राखाडी रंग हा प्रकाश आणि अंधार, सुख आणि दुःख यांसारख्या दोन टोकांच्या स्थितीतील मध्यस्थता अथवा त्या समतोल दर्शवतो. राखाडी रंग हा साधेपणाच्या किंवा शांततेच्या मागे अस्तित्वात असलेली प्रचंड आंतरिक व्यक्ती आणि ताकद, परिपक्वता दर्शवतो. मानसशास्त्रानुसार आंतरिक चंचलता दूर करणारा व मानसिक स्थिरता आणि शांतता निर्माण करणारा हाच राखाडी किंवा करडा रंग असल्याचे मानले जातेहा रंग मनाला शांत करतो, तणाव कमी करण्यास मदत करतो आणि सर्व परिस्थितीमध्ये वैचारिक स्थिरता जपण्यास मोलाची मदत करतो. या राखाडी करड्या रंगाला परिपक्वता, बुद्धिमत्ता आणि अनुभवाचे प्रतीक मानले जाते जसे की मेंदूच्या रचनेत असणारा 'ग्रे मॅटर'. राखाडी रंग हा काळा आणि पांढरा या दोन रंगाच्या मधला असल्यामुळे तो अंधकाराकडून प्रकाशाकडे किंवा अज्ञानाकडून ज्ञानाकडे रूपांतरण प्रक्रियेचा प्रतीक असा आहे. महाराष्ट्रातील दगड हे करड्या रंगाचे आहेत, महाराष्ट्राचे प्रमुख दैवत, करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पंढरपूरची विठ्ठलाची मूर्तीही करड्या रंगाची आहे. म्हणूनच या ठिकाणी या रंगाला विशेष सर्वाधिक असे महत्त्व प्राप्त होते. करडा किंवा राखाडी रंगाचा पोत असलेल्या दगडात निर्माण केलेल्या सर्व धर्मातील सर्व मूर्ती या आपापल्या स्थानी विशेष महत्त्व प्राप्त करून आहेत. करडा किंवा राखाडी रंग हा संसारीक भौतिक नश्वरतेचे प्रतीकही मानला जातो. शिवशंभो शंकराच्या देहावरील भस्म देखील राखाडी रंगाचेच असते. भस्म म्हणजे जळाल्यानंतर उरलेली राख. हे मानवी शरीराच्या आणि जगाच्या नश्वरतेचे प्रतीक आहे. हा संसार क्षणभंगुर असून शेवटी सर्व काही राखेमध्ये विलीन होणार आहे, हे भस्म म्हणजेच राखाडी रंग दर्शवते. भगवान शंकर हे संन्यासी आणि योगी आहेत. इतर देवतांप्रमाणे ते सोन्या-चांदीचे अलंकार घालत नाहीत, तर भस्म धारण करतात. यातून ते जगातील मोह-माया, अहंकार आणि आसक्ती नष्ट करण्याचा संदेश देतात. मानवी जीवनाचा प्रमुख उद्देश अर्थात वैराग्य आणि मुक्ती मार्ग दर्शवणारा हा रंग आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *