जॉन आणि त्याची पत्नी मेरी (दोन्ही नावे बदललेली आहेत) या दोघांकडेही घरातील छोटी-मोठी दुरुस्ती करण्याचे कौशल्य नव्हते. या निवृत्त जोडप्याकडे पुरेसे उत्पन्न आहे आणि घरातील दुरुस्तीच्या बाबतीत त्यांना ‘मिस्टर फिक्स-इट’ बनण्यात कोणताही रस नाही. पण जेव्हा एखादी छोटी समस्या निर्माण व्हायची, जसे की दरवाजाचे लॉक बदलायचे असेल, टॉयलेट फ्लश काम करत नसेल किंवा उन्हाळ्यात सीलिंग फॅन हळू चालतोय असे वाटत असेल, तेव्हा जॉन असे तात्पुरते उपाय शोधायचा, ज्याला तो ‘समस्या दूर करणे’ म्हणायचा. तो मेरीला सांगायचा, ‘जर तू टॉयलेटचे हँडल एका विशिष्ट पद्धतीने हलवलेस, तर काही अडचण येणार नाही.’ समस्येच्या गांभीर्यानुसार हे जोडपे तास, दिवस किंवा आठवडे असेच काम चालवून न्यायचे. जेव्हा मेरीला वाटायचे की आता हे चालणार नाही, तेव्हा ती एखाद्या प्रोफेशनलला बोलावून घ्यायची. तेव्हा जॉन रागावून तमाशा करायचा. तो मेरीला असे भासवण्याचा प्रयत्न करायचा की सर्वकाही ठीक आहे. पण जॉनच्या विरोधानंतरही मेरी प्रोफेशनलला बोलवायची, तर दुरुस्तीचे काम काही तास किंवा दिवस पुढे ढकलले जावे, अशी जॉनची इच्छा असायची. तथापि, जेव्हा दुरुस्ती करणारा यायचा, तेव्हा जॉन चांगली वागणूक द्यायचा आणि काम पूर्ण झाल्यावर ते मान्यही करायचा. पण समस्या आणि तिचे निराकरण यादरम्यान मेरीला खूप चिंता आणि विनाकारण तमाशा सहन करावा लागायचा. यामुळे वातावरण आणखी तणावपूर्ण व्हायचे. नंतर एका थेरपिस्टने सल्ला दिला आणि दोन महिन्यांनंतर मेरीची समस्या दूर झाली, ज्याचा सामना ती गेल्या एका दशकापासून करत होती. मेरीने थेरपिस्टला सांगितले की, शालेय जीवनात जॉन व्हायोलिन शिकायचा, पण काही क्लासनंतर त्याने ते बंद केले. 1970 च्या दशकात जॉन ज्या क्लासला जायचा, त्यानेच 2013 मध्ये जेव्हा प्रौढांसाठी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅच सुरू केली, तेव्हा थेरपिस्टने जॉनला सूटकेसमधून त्याचे व्हायोलिन काढण्यासाठी प्रेरित केले आणि तो दोन महिन्यांच्या रेसिडेन्शियल क्लाससाठी गेला. जॉनसाठी तो क्लास तसाच होता, जसा 50 वर्षांपूर्वी असायचा. अमेरिकेत प्रौढांसाठी अनेक प्रकारचे समर म्युझिक प्रोग्राम उपलब्ध आहेत. जॉनसारख्या शिबिरार्थींसाठी हे कार्यक्रम त्यांच्या तारुण्यातील संगीताशी जोडलेले अनुभव पुन्हा जगण्याची आणि नवीन सामाजिक संबंध निर्माण करण्याची संधी देतात. भावनिकदृष्ट्या संगीत रचना आत्म्यासाठी चांगली असते. यामुळे जॉन क्रिएटिव्ह झाला. त्याला स्वतःच्या आवडीचे संगीत रचण्याची संधी मिळाली आणि त्याचे मनोधैर्यही वाढले. हे संशोधन दर्शवते की मानसिकदृष्ट्या एखादे वाद्य शिकणे आणि वाजवणे मेंदूमध्ये चांगले न्यूरोलॉजिकल कनेक्शन तयार करण्यास मदत करते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ‘हे डिमेन्शिया दूर ठेवण्यास मदत करू शकते. जेव्हा तुम्ही एकत्र मिळून संगीत वाजवता, तेव्हा तुम्ही जीवनातील छोट्या-मोठ्या गोष्टींपलीकडे जाता आणि हा प्रत्येकासाठी सर्वात चांगला आध्यात्मिक अनुभव असतो.’जॉनच्या म्युझिक क्लास ट्रिपदरम्यानच मेरीने त्याला न सांगता घरातील सर्व गोष्टींची दुरुस्ती करून घेतली. परत आल्यावर जॉन खुश झाला आणि यामुळे दोघांचाही तणाव कमी झाला. हे समर म्युझिक प्रोग्राम वाजवण्याच्या क्षमतेनुसार वेगवेगळे असतात, जसे की बिगिनर्स, इंटरमीजिएट आणि ॲडव्हान्स. ‘म्युझिकल अमेरिका वर्ल्डवाइड’ आणि ‘द इन्स्ट्रुमेंटलिस्ट्स’ सारख्या काही संस्थांमध्ये तर आपल्या जुन्या टेलिफोन डिरेक्टरीसारखी गाइड्सही उपलब्ध असतात. काही कॅम्पमध्ये आजोबा आणि नातवंडे एकत्र विद्यार्थी असतात, कारण ते दोघेही नवशिके असतात. काही कॅम्पमध्ये तर 60 पार केलेल्या वृद्धांचा सहभाग दुप्पट झाला आहे आणि त्यांना वाटते की कॅम्पमध्ये निर्माण झालेली सामाजिक जोड महत्त्वाची आहे. फंडा असा की, आजकाल अनेक लोकांच्या जीवनात सामाजिक जोड कमी होत चालली आहे, त्यामुळे प्रत्येकाने घराबाहेर मिळणाऱ्या अशा संधीचा लाभ घेतला पाहिजे. कारण तिथे समान आवड असलेल्या नवीन लोकांशी जोडले जाता येते आणि याचा आपल्या आरोग्यावर तसेच वाढत्या वयावर सकारात्मक परिणाम होतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



