उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघाताबाबत आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले आहे. हा केवळ अपघात नसून एक मोठा घातपात असू शकतो, असा खळबळजनक संशय नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची मागणी केली आहे.
नाना पटोले यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या घटनेतील तांत्रिक बाबींवर बोट ठेवले आहे. विमानाचा अपघात झाला की घातपात, हे स्पष्ट करण्यासाठी ब्लॅक बॉक्सची सखोल चौकशी होणे अनिवार्य आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा की, ऐनवेळी विमानाचा पायलट का बदलला गेला? कोणाच्या सांगण्यावरून हा बदल झाला आणि नवीन पायलटची पार्श्वभूमी काय होती? याची पारदर्शक चौकशी झाल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.
केंद्र सरकारची ही परंपराच झाली
संबंधित विमान कंपनीचा मालक रोहित सिंग हा अपघातानंतर लगेच परदेशात पळाला आहे. जर काहीच लपवण्यासारखे नसेल, तर तो देश सोडून का गेला? त्याला तातडीने भारतात खेचून आणून त्याची कडक चौकशी झाली पाहिजे. केंद्र सरकारची ही परंपराच झाली आहे की, मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना परदेशात पळू द्यायचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला अभय द्यायचे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर बोलतानाही नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्रातील तपास यंत्रणांवर आता कोणाचाही विश्वास उरलेला नाही. गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताचा तपास अजूनही जनतेसमोर आलेला नाही. गोव्यातील क्लबमधील स्फोटाचा मालकही परदेशात पळाला, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावाही नाना पटोले यांनी केला आहे.
राजकीय स्वार्थासाठी त्यांना विलग ठेवलं जातंय
यावेळी नाना पटोले यांनी पवार कुटुंबातील अंतर्गत वादावर भाष्य करताना एक महत्त्वपूर्ण विधान केले. पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे, ही आमची आणि काँग्रेसची कायमची भूमिका आहे. परंतु, दिल्लीत बसलेले सत्ताधारी नेते या कुटुंबाला एकत्र येऊ देत नाहीत. त्यांच्यात जाणीवपूर्वक फूट पाडली जात आहे. कुटुंबात वाद नसावा हीच संस्कृती आहे, पण राजकीय स्वार्थासाठी त्यांना विलग ठेवले जात आहे, असे नाना पटोले म्हणाले.
हे सरकार विशिष्ट समाजाप्रती द्वेष दाखवतंय
हे सरकार पूर्णपणे द्वेषपूर्ण भावनेतून चालवले जात आहे. घटनात्मक पदावर बसताना कोणाबाबतही ममत्व किंवा द्वेष ठेवणार नाही अशी शपथ घेतली जाते. मात्र, मुस्लिम आरक्षणासारख्या मुद्द्यांवरून हे सरकार विशिष्ट समाजाप्रती द्वेष दाखवत आहे, हे दुर्दैवी आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितलं.
[embedded content]
शहर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- नागपूर: "देशातील संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी लादण्याचा काँग्रेसचा डाव" राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सत्ताधारी नेत्यांचा अत्यंत गंभीर व आक्रमक हल्लाबोल!
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
- छत्रपती संभाजीनगरः "मी मरेन, पण कधीही शरण जाणार नाही!"मनोज जरांगे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; दसऱ्यानंतर आंदोलनाची नवीन दिशा ठरवण्याचा इशारा
महाराष्ट्र
- सातारा: कृष्णा-कोयना काठच्या पिकांवर मोठे संकट; प्रशासनाकडून पीक पाहणीचा सविस्तर अहवाल सादर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- सातारा: वयाच्या पंच्याहत्तरीतही विशीसारखा उत्साह! वाईच्या जिद्दी आजीने सलग ९ वेळा वाचन करून स्वहस्ताक्षरात संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली
- ठाणे: कोपरी पोलीस ठाण्यातच महिलांनी युट्युब भाई सिद्धू अभंगेला धुतले; पोलिसांसमोरच घडला राडा
गुन्हा
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल



























Subscribe to my channel




