अलिबागमध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मालमत्ता मोजणीवरून वाद झाल्याचा आरोप होत आहे. रमेश पाटील यांच्या जागेत प्रवेश केल्यानं वाद झाला असा देखील आरोप होत आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता, या व्हिडीओसोबत ‘विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू?’ असा सवाल करत त्यांनी नार्वेकर यांना डिवचलं होतं, दरम्यान त्यानंतर आता संजय राऊत यांच्या या व्हिडीओवर राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले राहुल नार्वेकर?
संजय राऊत यांच्या आरोपावर यापूर्वी पण बोललो नाही, आणि बोलणार पण नाही. मी एवढेच सांगू इच्छितो हे त्यांच्या सर्व मनातल्या कल्पना आहेत. हे त्यांचे जुने दुखणे आहे, ते आता उफाळून आले आहे. म्हणून संजय राऊत का बोलतात कशाला बोलतात हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी जे आरोप केले आहे ते बिनबुडाचे आहेत. अलिबागला मी वारंवार जात असतो. माझ गाव आहे, तिथे माझी शेती आहे. तीथे मी माझी शेती बघायला गेलो होतो. दोन लोकांमध्ये वाद होताना दिसला त्यावेळेला तिकडे मारामारी होत होती. म्हणून मी तिकडे सांगितलं की तुम्ही मारामारी करू नका आणि शांतपणे बसून वाद मिटवा, त्या जागेशी माझं काही देणं घेण नाही, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यामुळे अशाप्रकारे बिनबुडाचे आरोप करून केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करण्याची संजय राऊत यांची जुनीच सवय आहे. त्यांच्याकडे जे व्हिडिओ असतील ते समोर आणू द्या, त्यांना चोख उत्तर दिलं जाईल. संजय राऊत यांना कदाचित कल्पना आहे की माहीत नाही, पण दिडशे वर्षांपासून आमचं अलिबागमध्ये वास्तव्य आहे, आमची तिथे जमीन आहे , त्यांना खोट्या अफवा पसरवायला आवडतात, त्यांना लखलाभ, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान संजय राऊत स्वतः जमीन घोटाळ्यात जेलमध्ये राहून आलेले आहेत, ते लोकांना काय शिकवण देणार? संजय राऊत जेलची हवा विसरलेले आहेत, आसा टोलाही यावेळी राहुल नार्वेकर यांनी लगावला आहे.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




