अलीकडेच मी माझ्या एका स्तंभात लिहिले होते कीलोकसभेत अल्पमतात असूनही भाजप देशास एकपक्षीयव्यवस्थेकडे नेत आहे. पण याची दुसरी बाजूही आहे. हेदुसऱ्या पक्षाच्या उभारणीच्या शक्यतेचा मार्गही बनवू शकते.अट ही आहे की, हा पक्ष त्या प्रादेशिक पक्षांचे उरलेसुरलेमतदान आपल्या पारड्यात ओढून घेईल, ज्यांना भाजपमिळवण्याचा प्रयत्न करत आहे. विडंबना अशी आहे की, भाजपचे यश काँग्रेसलात्याच्यासाठी एकमेव अखिल भारतीय आव्हान म्हणून समोरयेण्याची आपली जिद्द मजबूत करण्याची संधी देऊ शकते.मला माहीत आहे की या गृहितकावर बरीच शंका घेतलीजाईल, उलट काँग्रेसबद्दल निराश झालेले लोक याचीटिंगलही उडवू शकतात. पण भाजपला ठाऊक आहे कीत्याच्याविरुद्धचे एकमेव मोठे आव्हान काँग्रेसच आहे.पक्षाच्या निवडणूक भाषणांमध्ये सर्वाधिक हल्ला काँग्रेसआणि गांधी कुटुंबावरच केला जातो. हे सत्र त्याराज्यांमध्येही सुरू राहिले, ज्यांमध्ये काँग्रेस शून्य आहे.उदाहरणार्थ, आंध्र प्रदेशमध्ये वारंवार सांगितले गेले कीकाँग्रेसने राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कारटाकला होता, तर 2024 मध्ये तिथे काँग्रेसला अवघी 2.74टक्के मते मिळाली होती. ओडिशामध्ये प्रश्न विचारण्यातआला की काय ‘शहजादे’ 2014 ची कथा पुन्हा घडवणारआहेत? झारखंडमध्ये एका काँग्रेस मंत्र्याच्या घरकामकरणाऱ्याच्या घरातून जप्त केलेल्या रोकडचा दाखला देतप्रश्न विचारण्यात आले. बिहारमध्येही काँग्रेसच्या‘तुष्टीकरण’ राजकारणावर वारंवार हल्ले केले गेले.बंगालमध्ये काँग्रेसला तृणमूलचा सहकारी घोषित करतम्हटले गेले की हे दोन्ही पक्ष महिलांना 33% आरक्षणाच्यामार्गात अडथळा आणत आहेत. कुठे नगरपालिकेचीनिवडणूक होत असेल आणि काँग्रेसचे तिथे कोणतेही नामोनिशान नसेल तरीही तुम्ही भाजपला काँग्रेसवर हल्ला करताना पाहाल. संसदेच्या मान्सून अधिवेशनात यागृहितकाची सर्वात मोठी परीक्षा ही असेल की भाजप दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यात यशस्वी होतो की नाहीआणि संसदेचा आकार वाढवण्यासाठी तसेच मतदारसंघांचे नवीन सीमांकन करण्यासाठी संविधान संशोधन घडवून आणण्यात, महिला आरक्षण विधेयक पास करून घेण्यात यशस्वी होतो की नाही. 240 जागांपासून सुरू करून दोन-तृतीयांश बहुमतासाठी 362 किंवा त्याहून वरचाआकडा जमवणे राजकीय चमत्कारच ठरेल. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश आणिपंजाबमध्ये आणि शेवटी गुजरातमध्ये निवडणुका आहेत. त्यानंतरच्या वर्षी कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये निवडणुका होतील. मी केवळ त्या राज्यांची गणना करत आहे, ज्यांचे लोकसभेत 10 पेक्षा जास्तखासदार आहेत. यापैकी बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेसचभाजपची मुख्य प्रतिस्पर्धी असेल. त्यामुळे अपेक्षा हीचआहे की भाजपचा काँग्रेसविरोधी आवाज आणखी तीव्रहोईल. पण भाजप 2029 आणि त्यानंतरच्या काळाचाहीविचार करत आहे आणि तो कोणाला आपला भावीप्रतिस्पर्धी म्हणून पाहत आहे? ज्या प्रादेशिक पक्षांनी त्यांना240 वर रोखले होते त्यापैकी समाजवादी पक्षाला सोडूनबहुतांचा सफाया केला गेला आहे. द्रमुक आपलीविचारसरणी टिकवून आहे, पण तामिळनाडूमध्ये भाजपचेकोणतेही बळ नाही. आंध्रमध्ये तेलुगू देसम पक्षाने भक्कमआघाडी बनवली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी जगनमोहन रेड्डीयांचा पक्ष भाजपशी मुकाबला करणारा नाही. इंडिया आघाडीचे इतके सारे घटक पक्ष जेव्हा घायाळझाले आहेत तेव्हा काँग्रेससाठी भविष्य नवीन आव्हानहीआहे आणि नवीन संधीही. ती भाजपची एकमेव किंवाजवळची एकमेव प्रतिस्पर्धी म्हणून धाडसी उडी मारू शकतेकाय? काँग्रेसचे 21 टक्के मते तर पक्की दिसतात. भाजपला2024 मध्ये जवळपास 37 टक्के मते मिळाली. काँग्रेसने जर21 टक्क्यांवरून 5 टक्के जास्त मतेही आणली तरभाजपसाठी खेळ बिघडवू शकते. तुम्ही हे गृहीत धरूनचाललात की या अतिरिक्त मतांपैकी बहुतांश मतेभाजपपासून तुटून येतील. काँग्रेसने जर 30-32 टक्के मतेमिळवली तर भाजप 200 जागांच्या आकडेवारी संकुचितहोईल. तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाहीआघाडीचे रूप बदलेल. साहजिकच हे केवळ सैद्धांतिकविषय आहेत, पण भाजपलाही याची जाणीव आहे. ज्याअर्थी आपण सैद्धांतिक चर्चा करत आहोत, त्याअर्थीशैक्षणिक स्रोतांचा दाखला देणे उचित ठरेल. जॉनहॉपकिन्स युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे प्रकाशित ‘जर्नल ऑफडेमॉक्रसी’मधील जुलै 2026 मध्ये प्रकाशित एडगर सारआणि पेलिन अयान मुसिल यांच्या संशोधनावर नजर टाका.याचं शीर्षक भारतातील या प्रचलित धारणेच्या उलट आहेकी सत्तेत बसलेल्या पक्षाला पराभूत करण्याचा एकमेव मार्गआघाडीच आहे. संशोधन निबंधाच्या लेखकांचे म्हणणेआहे की विद्वान आणि रणनीतिकारांमध्ये झालेली हीसहमती भ्रमित करणारी आहे की प्रबळ सत्ताधारी पक्षांनानिवडणूकपूर्व बनवलेले पक्षच सत्तेवरून खाली खेचूशकतात. याचे पुरावे आहेत दोन आश्चर्यकारक सत्तास्थित्यंतरे - एक, हंगेरीमध्ये, ज्यामध्ये एकाच पक्षाने ‘तिस्जापक्ष’ ने व्हिक्टर ओरबानच्या फिदेस्झ पक्षाला सत्तेतून बाहेरहाकलले होते; दुसरे, 2024 मध्ये तुर्कियेमध्ये रिपब्लिकनपीपुल्स पार्टीच्या (सीएचपी) दणदणीत विजय. हंगेरीमध्येपीटर माग्यार यांनी नवीन पक्ष उभा केला आणि ओरबानलाभ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर घेरले. माग्यारसुद्धा ओरबानइतकेचकट्टर दक्षिणपंथी आहेत. तुर्कियेमध्ये सीएचपीने स्वतःलानव्या रूपात सामावून घेतले आणि व्यापक विरोधीमतदारांना आपल्या बाजूने सामावून घेतले. हा व्यापकविरोधी मतदार प्रत्येक लोकशाहीमध्ये अस्तित्वात आहे,भारतातही आहे. विरोधक ही मते एकत्र करण्यासाठीबहुपक्षीय आघाड्यांची स्थापना करत आले आहेत. काँग्रेसहा प्रयत्न स्वबळावर करण्याची हिंमत करू शकते काय? आपण श्रीलंका आणि नेपाळमध्ये पाहिले की,शक्तिशाली पक्षालाही कशा प्रकारे सत्तेवरून बेदखल केलेजाऊ शकते. काँग्रेस स्वतःला नवीन अवतारात उभारूशकते? डावे-उजवे हा द्वंद्व कामी येणार नाही. कारणजनकल्याण, वितरणवादी अर्थनीती, सार्वजनिक क्षेत्र,सबसिडी इत्यादी मुद्द्यांवर भाजप काँग्रेसपेक्षा जास्त डाव्याविचारसरणीचा कल प्रदर्शित करते. काँग्रेसला नवीन विचारआणि अजेंडा आणावा लागेल. काँग्रेस या सर्व प्रकरणांनाकशी तोंड देईल? बदललेल्या जगाच्या पार्श्वभूमीवरकाँग्रेसची परराष्ट्र धोरण, आणि अर्थनीती काय असेल? तीम्हणते की मोदी आर्थिक वाढीची जी आकडेवारी देतआहेत, ती खोटी आहे तर काँग्रेस भारताच्या आर्थिकवाढीचा दर 8 टक्क्यांवर कसा पोहोचवेल? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) आगामी विधानसभा निवडणुकांतहीसरळ सामना आहे...पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब आणिगुजरातमध्ये निवडणुका आहेत. त्यानंतरच्या वर्षीकर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणिछत्तीसगडमध्ये निवडणुका होतील. यापैकीबहुतांश राज्यांमध्ये काँग्रेसच भाजपची मुख्यप्रतिस्पर्धी असेल. त्यामुळे भाजपचाकाँग्रेसविरोधी आवाज आणखी तीव्र होईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



