विराग गुप्ता यांचा कॉलम:बाइक टॅक्सीचे लाभ प्रवाशांसह ‎गिग वर्कर्सनाही मिळावेत

करसवलती आणि नियमांतील सुलभतेमुळे कंपन्यांचा‎नफा वाढला आहे. तरीही कामगारांचे वेतन आणि‎रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होत नाही. पंतप्रधानांनीही‎नुकतीच याबाबत चिंता व्यक्त केली होती. नियमांतील‎पळवाटांचा फायदा घेऊन नफा वाढवणाऱ्या कंपन्या‎जबाबदारीतून कशी सुटका करून घेत आहेत? बाइक‎टॅक्सीच्या संदर्भात हे 5 मुद्द्यांवरून समजून घेता येईल:‎ 1. उबरने 2013 मध्ये परवान्याशिवाय ॲपद्वारे ऑनलाइन‎कॅब सेवा सुरू केली होती. वाहनांची नोंदणी आणि टॅक्सी‎परमिट देण्याचे कायदेशीर अधिकार राज्यांकडे आहेत.‎केंद्र सरकारने ऑक्टोबर 2015 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार‎ॲप आधारित टॅक्सीला ‘ॲग्रिगेटर’चा दर्जा दिला आणि‎राज्यांना नियम बनवण्याचा सल्ला दिला. सार्वजनिक ‎‎वाहतुकीची दयनीय अवस्था आणि टॅक्सींचे महागडे‎परवाने यांच्या काळात, अशा मार्गदर्शक तत्त्वांच्या आडून ‎‎मोजक्या कंपन्यांनी परिवहन क्षेत्रात मक्तेदारी निर्माण केली. ‎‎त्यातून त्यांनी अब्जावधींचे साम्राज्य उभे केले आहे.‎रॅपिडोचे मूल्य 25 हजार कोटी रुपये आहे, तर उबरचे मूल्य‎12 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.‎ 2. 2015 मध्ये रॅपिडोने बेंगळुरूमध्ये बाइक टॅक्सीची‎सुरुवात केली. महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीसह अनेक‎राज्यांत कडक कारवाई सुरू झाल्यावर उच्च न्यायालय‎आणि सर्वोच्च न्यायालयात खटले सुरू झाले. सरकारने‎2020 मध्ये नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.‎कर्नाटकातील तज्ज्ञ समितीने एप्रिल 2019 च्या अहवालात‎बाइक टॅक्सीचे फायदे, तोटे आणि संकटांवर सविस्तर‎भाष्य केले होते. या अहवालानुसार, बाइक टॅक्सीमुळे‎वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग आणि प्रदूषण वाढत आहे.‎चालकांना प्रशिक्षण, पार्टनर्सची सुरक्षा आणि प्रवाशांकडून‎होणारी मनमानी भाडेवसुली रोखण्यासाठी बनवलेले‎नियम लागू केले जात नाहीत.‎ 3. कोट्यवधी ग्राहकांच्या डेटाचा वापर करून ओला,‎उबर आणि रॅपिडोने टॅक्सी, फूड डिलिव्हरी आणि क्विक‎कॉमर्समध्ये मक्तेदारी मिळवली आहे. या कंपन्या स्वतःला‎मध्यस्थ (इंटरमीडियरी) म्हणवून कायद्यांच्या पालनातून‎पळवाट काढतात. बाइक टॅक्सीसाठी कोणत्याही‎परवान्याची गरज नाही, असा दावा उबरने केला होता. मुंबई‎उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता‎यांच्या 7 मार्च 2022 च्या आदेशात याचा उल्लेख आहे.‎महाराष्ट्र, कर्नाटकातील सरकारी अहवालांवरून हे स्पष्ट‎होते की, या कंपन्या सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन‎करत नाहीत. त्यामुळे गीग वर्कर्सचे शोषण वाढत आहे.‎ 4. महाराष्ट्रात कंपन्यांनी आवश्यक माहिती देण्यास‎तसेच सर्व ठिकाणी कार्यालये सुरू करण्यास नकार दिला.‎त्यामुळे परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांचे परवान्याचे अर्ज‎फेटाळले. अशा आदेशाविरुद्ध न्यायाधिकरणात‎अपिलाची कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र, त्याऐवजी‎व्यवसायाच्या मूलभूत अधिकाराच्या संरक्षणाचा आधार‎घेत या कंपन्यांनी कलम 226 आणि कलम 32 अंतर्गत‎याचिका दाखल करून न्यायालयातून दिलासा मिळवला.‎ 5. कर्नाटकात बाइक टॅक्सीच्या विरोधात एका‎न्यायाधीशांच्या खंडपीठाने एप्रिल 2025 मध्ये निकाल‎दिला होता. तो निकाल दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎जानेवारी 2026 मध्ये रद्द केला. त्याविरुद्ध राज्य सरकारने‎केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाच्या दोन‎न्यायाधीशांच्या खंडपीठाने 4 ओळींच्या आदेशात‎फेटाळून लावले आहे. जर हा राज्यांचा विषय आहे,‎तर मग केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे न्यायालय‎बंधनकारक कशी करू शकते? नितीन गडकरी‎यांच्या मते, बाइक टॅक्सीला सर्व राज्यांमध्ये परवानगी‎दिल्यास 15 ते 20 कोटी लोकांचे उत्पन्न वाढू शकते.‎परंतु कंपन्यांच्या नफ्याचा लाभ प्रवाशांना आणि गिग‎वर्कर्सना मिळवून देण्यासाठी स्पष्ट कायदा आणि‎केंद्रीय नियामक आवश्यक आहे. तक्रार निवारण,‎प्रवाशांची सुरक्षा आणि गिग वर्कर्सच्या कल्याणाशी‎संबंधित कायदे संपूर्ण देशात समान पद्धतीने लागू‎व्हायला हवेत. यासाठी केवळ मार्गदर्शक तत्त्वांऐवजी‎संसदेने केंद्रीय कायद्यात व्यापक बदल करणे गरजेचे‎आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ बाइक टॅक्सीला सर्व राज्यांमध्ये परवानगी‎दिल्यास 15 ते 20 कोटी लोकांचे उत्पन्न‎वाढू शकते. मात्र, कंपन्यांच्या नफ्याचा‎फायदा प्रवाशांना आणि गिग वर्कर्सना‎मिळवून देण्यासाठी स्पष्ट कायदा आणि‎केंद्रीय नियामक यंत्रणा गरजेची आहे.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *