मुंबई शहरातून बेपत्ता झालेल्या मुलांबाबत सतत अनेक वृत्त समोर येतात. परंतु या बेपत्ता मुलांचा नंतर शोध लागतो का, हा आकडा दिवसेंदिवस वाढत का जातोय, असे अनेक प्रश्न नागरिकांसमोर आहेतच. अशातच मुंबई पोलिसांनी या मुलांचा शोध घेण्यासाठी कंबर कसलेली आहे. हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याचं काम पोलिसांकडून प्राधान्यक्रमाने केलं जातंय. 2025 मध्ये शहरातून बेपत्ता झालेल्या 2182 मुलांपैकी 2165 मुलांचा पोलिसांनी सुरक्षितपणे शोध घेतला आहे. या सर्व मुलांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आलं आहे. म्हणजेच जवळजवळ 99 टक्के हरवलेली मुलं सुरक्षितपणे सापडली आहेत. 2026 मध्येही पोलिसांनी हे काम धडाडीने सुरूच ठेवलं असून आतापर्यंत बेपत्ता झालेल्या 0 ते 5 वयोगटातील सर्व सात मुलांना शोधून काढलं आहे. मुंबई पोलिसांचं हे मोठं यश मानलं जात आहे.
याविषयी सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी म्हणाले, “कमी वयातील आणि अगदी लहान मुलांशी संबंधित प्रकरणांना अधिक प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे आतापर्यंत या वर्षातील मुलांची रिकव्हरी ही शंभर टक्के आहे.” 2026 च्या सुरुवातीच्या महिन्यांतच जवळपास 178 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याचं वृत्त होतं. मुंबई पोलिसांच्या त्वरित कारवाईनंतर त्यापैकी 161 मुलं साडपली आहेत. तर 17 अल्पवयीन, ज्यामध्ये 8 मुलं आणि 9 मुलींचा समावेश आहे, ते अजूनही बेपत्ताच आहेत. बेपत्ता झालेली ही सर्व मुलं 16 ते 18 वयोगटातील आहेत.
इतर अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण देशात स्पेशल टीम तैनात करण्यात आले आहेत. सध्या त्यांचं स्थळ ट्रॅक करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा त्यांच्या पालकांकडे सुरक्षितरित्या सोपवण्यासाठी तीन ते चार पथकं भारताच्या वेगवेगळ्या भागात कार्यरत आहेत. 2025 मध्ये शोधलेल्या 2165 मुलांपैकी 55 टक्के मुलं आणि 45 टक्के मुली होत्या. काही अल्पवयीन मुलं घरच्यांशी भांडून पळून मुंबईत येतात. तर मुंबईतील रेल्वेगाड्या आणि रेल्वे परिसरातील गर्दीमुळे अनेक लहान मुलांची पालकांशी ताटातूट होते आणि मुलं हरवतात.
दादर, सीएसएमटी आणि मुंबई सेंट्रल या तीन महत्त्वाच्या ठिकाणी जिल्हा बाल संरक्षण कक्षांतर्गत रेल्वे चाइल्ड हेल्प डेस्कसुद्धा कार्यरत आहेत. संकटात सापडलेल्या किंवा हरवलेल्या मुलांना तातडीने मदत मिळावी म्हणून हे डेस्क तैनात आहेत.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



