अलीकडे टॉक्सिक फॅन-कल्चर पुन्हा एकदा भीषणस्वरूपात समोर आले. आयपीएलमध्ये ट्रॅव्हिस हेडआणि विराट कोहली यांच्या हस्तांदोलनावरून निर्माणझालेला वाद हेडच्या पत्नी आणि कुटुंबापर्यंत पोहोचला.पुन्हा एकदा आपण मर्यादा तोडलेल्या पाहिल्या. मात्र, हेपहिल्यांदाच घडलेले नाही. प्रत्येक वेळी अशा घटनाघडतात. तेव्हा हे ट्रोल्स चाहतावर्गाच्या भावनेला कलंकलावताना आणि घृणास्पद कृत्य करताना दिसतात.कोणालाही कुणाच्या कुटुंबाला लक्ष्य करण्याचा हक्कनाही. या विषयावर शून्य सहनशीलतेची भूमिकाआवश्यक आहे. मी स्वतः ही परिस्थिती अनुभवली आहे आणि आई, पत्नी किंवा मुलांना अपमानास्पद नावांनीहाक मारली जाणे किती वेदनादायक असते, हे मलामाहीत आहे. हाच तो टप्पा आहे. येथे सोशल मीडियागलित स्थितीत जातो. त्यावर तातडीने नियंत्रणआणण्याची गरज आहे. ट्विटर किंवा इतर सोशल मीडिया माध्यमांवरीलटॉक्सिक चाहत्यांच्या या फौजेलाही हे समजून घ्यावेलागेल की, एखाद्या व्यक्तीविषयी आंधळी निष्ठादाखवून ते मोठ्या उद्देशालाच हानी पोहोचवत आहेत. ट्रॅव्हिस हेडच्या पत्नीवर अपमानास्पद टिप्पणी करून ते विराट कोहलीविषयी निष्ठा सिद्ध करत नाहीत. प्रत्यक्षातव्यक्ती-केंद्रित फॅन-संस्कृती दिवसेंदिवस अधिक क्रूरआणि विषारी बनत आहे. व्यक्तिपूजा ही भारतीयक्रीडाक्षेत्रातील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक राहिलीआहे. अनेकदा असे वाटते की, आपल्या आवडत्याखेळाडूने धावा केल्या की चाहते समाधानी होतात, मगसंघ हरला तरी चालते. त्याच धर्तीवर मग असा विचारहोतो की, आपल्या आवडत्या खेळाडूसोबत वादघालण्याची हिंमत कुणी केलीच कशी? मग त्याच्याकुटुंबालाही यात ओढले जाते. तेंडुलकर आणि द्रविडयुग कोहली आणि रोहितपूर्वी होते. त्यांच्याही आधीगावस्कर आणि कपिल यांचा काळ होता. पण विराटआणि रोहित समर्थकांमधील टॉक्सिक फॅन-वॉर दिसतेतसे यापूर्वी कधीच पाहायला मिळाले नव्हते. आणि यातसर्वात मोठे नुकसान भारतीय क्रिकेटचेच होत आहे. याघटनेनंतर ट्रॅव्हिस हेडच्या समर्थनाचा दावा करणारीबनावट खातीही समोर आली. त्यांचा वापर कोहलीआणि त्यांच्या कुटुंबियांना अपमानित करण्यासाठीकरण्यात आला. हेही तितकेच निषेधार्ह आहे. यात शंकानाही की, भारतीय ‘चाहत्यां’चाच एक गट यामागे आहे.त्यांच्यासाठी हा फक्त स्वतःचा द्वेष आणि कोहलीविरोधव्यक्त करण्याचा आणखी एक मार्ग आहे. परिणामी,वेगवेगळे चाहतागट एकमेकांशी भांडताना दिसत आहेतआणि त्यासाठी परस्परांना दोष देत आहेत. आता याट्रोल्सविरोधात कारवाई करण्याची वेळ आली आहे. हेकायमचे थांबवले पाहिजे. द्वेष पसरवणे हा नव्याभारताचा चेहरा बनत चालला आहे, पण आपण अशाभारताच्या बाजूने नाही. आपण त्यावर विश्वास ठेवतनाही आणि समाज म्हणून ते स्वीकारणारही नाही. हावाद केवळ सामन्यातील एका हस्तांदोलनाचा आहे.प्रत्येक खेळात कुणीतरी जिंकतो, कुणीतरी हरतो. त्याचाकुणाच्या कुटुंबाशी, पत्नीशी किंवा मुलीशी काही संबंधनाही. आणि जो कोणी ही मर्यादा ओलांडतो, तो भ्रमितआहे किंवा सभ्य समाजात राहण्यास योग्य नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना आता असे वाटूलागले आहे की, त्यांना काहीही बोलण्याचा आणित्यातून सुटून जाण्याचा अधिकार आहे. काळाच्याओघात सोशल मीडिया अनियंत्रित शिवीगाळीचे मैदानबनले आहे. एका पातळीवर ते अश्लील आणि घृणास्पदआहे, तर दुसऱ्या पातळीवर अत्यंत चिंताजनक आहे. हेलोकांच्या मनातील खोल अस्वस्थता आणि राग उघडकरते. आपण ही परिस्थिती खूप काळ चालू दिली आहेआणि सोशल मीडियावरील चर्चा आपण स्वतःला ज्याअवस्थेत अडकवले आहे, त्याचेच प्रतिबिंब बनलीआहे. खऱ्या चाहत्यांनी आता याविरोधात उभे राहिलेपाहिजे आणि हे थांबवले पाहिजे. चाहत्यांनी यापरिस्थितीची गंभीरता समजून घेत द्वेषप्रदर्शन थांबवणेअत्यंत आवश्यक आहे. अनेक जण म्हणतील की, हेआपल्या आयुष्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या सोशलमीडियाचे उपउत्पादन आहे. पण याविरोधात फारसेसंघटित आंदोलन कधीच झाले नाही. एखाद-दुसरेवक्तव्य या समस्येचे समाधान करू शकणार नाही.यासाठी सामूहिक कारवाई आवश्यक आहे, तेव्हाच हेट्रोल्स थांबतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनाही कायस्वीकारार्ह आहे आणि काय नाही, हे समजून घ्यावेलागेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लोकांना आता काहीही बोलण्याचाआणि बोलून मोकळे होण्याचा हक्कअसल्यासारखे वाटू लागले आहे, हीअत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे.कालांतराने सोशल मीडिया अनियंत्रितशिवीगाळीचे व्यासपीठ बनले आहे. हीचिंतेची बाब आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- 'क्लोड एआय' (Claude AI) म्हणजे काय आणि ते कसे काम करते? जाणून घ्या खास फीचर्स!
- पावसाची प्रतीक्षा संपणार! महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज; २३ जूननंतर मान्सूनची आगेकूच वेगवान होणार.
- पुण्यात पाणी टंचाईचे संकट असताना गळतीचा कहर; शिवाजीनगरमध्ये व्हॉल्व्ह खराब असल्याने २५ हजार लिटर पाण्याची नासाडी!
- मुंबईकरांनो प्रवासाचे नियोजन आधीच करा! मध्य रेल्वेवर २४ ते २६ जून दरम्यान ५६ तासांचा 'महा-मेगाब्लॉक'; अनेक लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम
महाराष्ट्र
- पावसाची प्रतीक्षा संपणार! महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज; २३ जूननंतर मान्सूनची आगेकूच वेगवान होणार.
- पुण्यात पाणी टंचाईचे संकट असताना गळतीचा कहर; शिवाजीनगरमध्ये व्हॉल्व्ह खराब असल्याने २५ हजार लिटर पाण्याची नासाडी!
- मुंबईकरांनो प्रवासाचे नियोजन आधीच करा! मध्य रेल्वेवर २४ ते २६ जून दरम्यान ५६ तासांचा 'महा-मेगाब्लॉक'; अनेक लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम
- विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा दणका! रेल्वे प्रशासनाकडून दंडाच्या रकमेत दुप्पट वाढ; आजपासूनच लागू होणार नवीन कडक नियम
गुन्हा
- बीडमध्ये भरदिवसा थरार! ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या वादातून मुकादमाचे अपहरण; स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघांवर गुन्हा दाखल
- राम मंदिर दान चोरी प्रकरण: केवळ ४५ दिवसांचेच CCTV फुटेज उपलब्ध, जुने रेकॉर्डिंग गायब झाल्याने SIT समोर पेच!
- दिल्ली: 'काळी जादू' करत असल्याच्या संशयातून डॉक्टरने केली घरकाम करणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या; उपचारादरम्यान नैराश्यातून टोकाचे पाऊल.
- पुणे: कामशेत परिसरातील नायगाव येथील धाब्यावर महिलेवर जीवघेणा हल्ला आणि विनयभंग; पार्किंगमधील वाद विकोपाला.
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
- 'फूड सेफ्टी' अलर्ट! तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचे कारण; FSSAI ने जारी केले कडक नवीन नियम.
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

ठाकरे गट आणि काँग्रेसच्या संभाव्य राजकीय समीकरणांबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधान केलं आहे.
पुणे-सातारा महामार्गावर टेम्पोची जोरदार धडक Pune Accident | पुणे-सातारा
लोणारच्या निसर्गात मोरांचा मोहक नृत्याविष्कारलोणारच्या निसर्गात मोरांचा मोहक नृत्याविष्कार
देश विदेश
- राम मंदिर दान चोरी प्रकरण: केवळ ४५ दिवसांचेच CCTV फुटेज उपलब्ध, जुने रेकॉर्डिंग गायब झाल्याने SIT समोर पेच!
- नागपूर: नीट (NEET) री-एग्झाममध्ये पुन्हा गोंधळ! नागपूरच्या विद्यार्थ्याला मिळाले थेट अबुधाबीतील सेंटर; पालकांचा संताप.
- माजी पंतप्रधान आय. के. गुजराल यांचे सुपुत्र नरेश गुजराल सायबर फसवणुकीचे बळी; ७८ लाखांची लूट, पोलिसांनी ७० टक्के रक्कम गोठवण्यात यश.
- न्यूयॉर्क हादरलं! प्रसिद्ध 'टाईम्स स्क्वेअर'वर भीषण गोळीबार; गोळीबाराच्या आवाजाने नागरिकांची पळापळ, थरारक व्हिडिओ व्हायरल



























Subscribe to my channel


