प्रियदर्शन यांचा कॉलम:सिनेमा दाहक सत्य मांडतो,‎ जे सरकारांना ऐकायचे नसते

‎‎‎‎‎‎‎‎इराणच्या एका न्यायालयाने जगप्रसिद्ध चित्रपटनिर्माते‎जफर पनाही यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.‎त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत. गेल्या‎वर्षी त्यांना एका वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यात आता‎आणखी चार वर्षांची भर घालण्यात आली आहे. हा तोच‎इराण आहे, ज्याने सध्या ट्रम्प यांना सळो की पळो करून‎सोडले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात प्रचंड विध्वंस‎होऊनही इराणने खंबीरपणा दाखवला. आपली संपूर्ण‎नेतृत्व फळी नष्ट होताना पाहून आणि मोठे नुकसान‎सोसूनही ज्या धैर्याने त्यांनी अमेरिकेचा सामना केला ते‎नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.‎ पण एका साम्राज्यवादी शक्तीविरुद्ध इतक्या धैर्याने‎लढणारा हा कसा इराण आहे? जो स्वतःच्याच देशात ‎‎असहमती आणि टीकेचा एक आवाज सहन करायला‎तयार नाही. असे नाही की, असा इराण आपण पहिल्यांदाच ‎‎पाहत आहोत. खरं तर इराणमध्ये आधीपासूनच सध्याच्या ‎‎सरकारविरुद्ध बंड सुरू होते. याच आशेवर अमेरिकेने‎हल्ला केला होता की, इराणमधील बंडखोर त्यांच्या बाजूने ‎‎उभे राहतील. मात्र, या साम्राज्यवादी मनसुब्यांवर इराणची ‎‎राष्ट्रीयत्व भावना भारी पडली. ही भावना इराणने‎शतकानुशतकांच्या स्मृती आणि सततच्या संघर्षातून‎मिळवली आहे. मदतीच्या नावाखाली कोणत्याही बाह्य‎शक्तीने आपल्या देशाच्या सरकारला बाहुले बनवणे इराणी‎जनतेला मान्य नव्हते. त्यामुळे येथे एक फरक स्पष्ट‎दिसतो. इराणी सरकार वेगळे आहे आणि इराणी राष्ट्र‎वेगळे आहे. इराण नावाच्या देशाचा इतिहास आणि त्याची‎चेतना तिथल्या राज्यकर्त्यांपेक्षा वरचढ आहे. जफर पनाही‎जेव्हा इराणच्या सरकारला न रुचणारी एखादी गोष्ट‎बोलतात किंवा तसा चित्रपट बनवतात तेव्हा ते त्यांच्या‎सरकारच्या विरोधात असू शकतात, पण आपल्या देशाच्या‎विरोधात नसतात. किंबहुना ते आपल्या त्या देशाच्या‎बाजूने उभे असतात, जो देश सरकार आणि नेतृत्व फळी‎नष्ट झाल्यानंतरही अमेरिकेशी दोन हात करतो.‎ सरकारे स्वतःला देशाच्या पाठीमागे लपवू पाहतात.‎अनेकदा ते स्वतःच देश बनू पाहतात. सरकारच्या‎विरोधातील कोणत्याही संघर्षाला देशद्रोह ठरवण्याची‎चलाखी करणे ही नेत्यांची सवयच असते.‎ जफर पनाही सध्या कुठे आहेत हे कोणालाच माहीत‎नाही. त्यांना यापूर्वीही अनेकदा अटक झाली आहे. त्यांनी‎तुरुंगात उपोषणही केले आहे. ते प्रसिद्ध चित्रपटनिर्माते‎अब्बास कायरोस्तॉमी यांचे सहायक होते. ‘व्हाइट‎बलून’सारखा अत्यंत सुंदर चित्रपट बनवून त्यांनी दिग्दर्शक‎म्हणून सुरुवात केली. या चित्रपटात नवीन वर्षाच्या‎पूर्वसंध्येला आईकडे हट्ट करून गोल्डफिश विकत‎घ्यायला जाणाऱ्या एका लहान मुलीची पाचशेची नोट‎हरवते. ती नोट नंतर एका दुकानाला लागून असलेल्या‎गटारात पडते. ती नोट दिसत असते, पण तिला बाहेर‎काढणे सोपे नसते. वेळेवर घरी न परतलेल्या त्या मुलीला‎शोधण्यासाठी तिचा भाऊ येतो. मग ते दोघेही नोट‎काढण्याच्या प्रयत्नात लागतात. त्यानंतर फुगे विकणारा‎एक मुलगा त्यांना मदत करतो आणि नोट बाहेर येते.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎मुलांच्या या संयुक्त प्रयत्नांच्या दरम्यान, हा चित्रपट इराणी‎समाजाच्या अनेक पैलूंवर शांतपणे भाष्य करून जातो.‎ खरं तर इराणी सिनेमा हा जगातील एक महान सिनेमा‎आहे. या सिनेमाने अनेक मोठे चित्रपटनिर्माते दिले आहेत.‎1979 च्या इस्लामी क्रांतीच्या कट्टरतेशी जुळवून घेत‎असतानाही या सिनेमाने त्याचा धैर्याने प्रतिकार केला आहे.‎वास्तविक हा प्रतिकार संपूर्ण इराणी समाजाचे सत्य आहे.‎ एका अर्थी असे म्हणता येईल की, इराणचे चित्रपटनिर्माते‎आपल्या जनतेसोबत उभे आहेत. ते सत्याचा धोका‎पत्करायला तयार आहेत. पण आपण हेच आपल्या अनेक‎चित्रपटनिर्मात्यांबद ्दल म्हणू शकतो का? जे‎राजकारणापासून अर्थकारणापर्यंत सर्व गोष्टींवर बोलतात,‎पण जिथे खरोखर बोलण्याची गरज असते, तिथे मात्र ते‎गप्प बसतात. आणि याच मौनामुळे खूप यश मिळवूनही‎हिंदी सिनेमा इराणी सिनेमाच्या मागे राहतो का?‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ एका साम्राज्यवादी शक्तीविरुद्ध इतक्या‎धैर्याने लढणारा हा कसा इराण आहे? जो‎स्वतःच्याच देशात असहमती आणि‎टीकेचा एक शब्दही सहन करायला तयार‎नाही. असेही नाही की, अशा इराणला‎आपण पहिल्यांदाच पाहत आहोत.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *