कोल्हापूर: राज्यातील ज्येष्ठ नेते आणि शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील ऊर्फ डी. वाय. पाटील यांचं वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती, आणि अखेर त्यांनी आज सकाळी कोल्हापूर येथे अखेरचा श्वास घेतला. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठं साम्राज्य उभं करणाऱ्या डी. वाय. पाटील यांच्या निधनाने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. काँग्रेसच्या तिकिटावर ते आधी नगरसेवक आणि नंतर दोनदा आमदार म्हणून निवडून आले. डी. वाय. पाटील हे १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर देखील राहिले होते. मात्र, निवडणुकीच्या राजकारणात त्यांचं मन फार काळ रमलं नाही. त्यांनी आपले लक्ष शिक्षणक्षेत्राकडे वळवले आणि राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात आपल्या शिक्षणसंस्थांचे मोठे जाळं उभारले. विविध रुग्णालयांच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य क्षेत्रातही मोठे योगदान दिले. तसेच, नवी मुंबई येथे भव्य क्रिकेट स्टेडियम उभारत क्रीडा क्षेत्रातही आपला मोठा ठसा उमटवला.
दीर्घकाळ काँग्रेस पक्षात सक्रिय राहिलेल्या डी. वाय. पाटील यांनी २४ डिसेंबर २०१८ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक दूरदृष्टीचा नेता, उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ
आणि समाजसेवक गमावला आहे.
दरम्यान, डी. वाय. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बुधवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत 'यशवंत निवास', कसबा बावडा इथे ठेवण्यात येणार आहे. उद्या सायंकाळी ४ वाजता अंत्ययात्रा निघणार असून सायंकाळी ५ वाजता डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, लाईन बाजार, कसबा बावडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
शहर
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- पुणे: सुषमा अंधारे पक्ष सोडणार नाहीत, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना योग्य न्याय द्यावा: सचिन अहिर यांचे स्पष्ट मत
- पुणे: खड्ड्यांचा भयानक थरार, चाकण एमआयडीसीमध्ये दुचाकी घसरल्याने ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: मद्यधुंद पोलीस कॉन्स्टेबलचा कारनामा! पुण्यामध्ये पोलीस व्हॅनने अनेक वाहनांना दिली धडक, सुदैवाने जीवितहानी टळली
महाराष्ट्र
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- पुणे: सुषमा अंधारे पक्ष सोडणार नाहीत, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना योग्य न्याय द्यावा: सचिन अहिर यांचे स्पष्ट मत
- पुणे: खड्ड्यांचा भयानक थरार, चाकण एमआयडीसीमध्ये दुचाकी घसरल्याने ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
गुन्हा
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
- सातारा: लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे वारंवार अत्याचार; पाटणमधील खासगी खासगी शिक्षकाला पोलिसांची बेडी
- कोल्हापुरात खळबळ! २५० हून अधिक बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या निवृत्त शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत गायकवाडला रंगेहात अटक; मोठे रॅकेट उघडकीस
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
























Subscribe to my channel




