22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. तब्बल 26 पर्यटकांचा जीव या हल्ल्यात गेला. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना कलमा पठण करण्यास सांगितले. ज्या पर्यटकाला कलमा वाचता आला नाही, त्याला गोळ्या झाडण्यात आल्या. या दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडीओ पुढे आली. धडाधड करून पर्यटकांना गोळ्या झाडल्या. या दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळाले, कारण दहशतवाद्यांनी थेट धर्म विचारून जीव घेतले. गेल्या काही महिन्यापासून या दहशतवादी हल्ल्याचे प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती पुढे आली. गोळीबार करून दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. या हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांची अड्डे उद्धवस्थ करत कंबरडे मोडले.
पहलगाम हल्ल्यात राज्यातील काही पर्यटकांचा मृत्यू झाला. संतोष जगदाळे हे पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले होते. संतोष जगदाळे मूळ पुण्याचे असून त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देणार असल्याचे त्यावेळी सरकारने जाहीर केले होते. मात्र, जगदाळे कुटुंब अजूनही नोकरीसाठी वाट बघत आहे. नोकरीच्या प्रस्तावावर निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांचे कुटुंबिय आसावरी जगदाळे आणि प्रगती जगदाळे यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करीत आहोत. राज्य शासनाने नोकरीचे आश्वासन दिले होते. मात्र, नोकरीच्या प्रस्तावाला मंत्रालयातून अध्याप मंजुरी मिळाली नाही.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र होऊ शकला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या पीए यांना संपर्क करतोय पण आमचा संपर्क होत नसल्याचे त्यांनी यादरम्यान म्हटले. नोकरीची आस लावून जगदाळे कुटुंब बसले आहे. संतोष जगदाळे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला अत्यंत मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


