पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सृजनाच्या अनोख्या रूपांचे‎ प्रमाण म्हणजे रामचरितमानस

माणसाच्या नसानसात भिनते आणि कुटुंबांची आचारसंहिता बनते,‎असे फार थोडेच साहित्य असते. अशात एका साहित्याचे नाव म्हणजे‎- रामचरितमानस. याचे रचनाकार तुलसीदास यांची आज जयंती आहे.‎गेल्या काही वर्षांत तुलसीदास यांना केवळ एक साहित्यिक मानून‎कार्यक्रम केले गेल्याचे दिसते. वास्तविक ते मानसशास्त्रज्ञ ऋषी होते.‎रामचरितमानस रचून आता 450 वर्षे पूर्ण झाली. या ग्रंथाची रचना‎करण्यासाठी 2 वर्षे, 7 महिने व 26 दिवस लागले होते. त्या वेळी‎तुलसीदास 80 वर्षांचे होते. वय ही अडचण ठरते असे कोण म्हणते?‎उलट वय वाढते तशी सृजनक्षमता अधिक समृद्ध होते. शब्दांच्या‎निर्मितीची किती अनोखी रूपे असू शकतात, याचे रामचरितमानस हे‎जिवंत उदाहरण आहे. तुलसीदासांना 126 वर्षांचे आयुष्य लाभले. या‎सव्वाशे वर्षांत त्यांनी हजारो वर्षांचे काम करून ठेवले. आपण‎त्यांच्याकडून एक धडा घ्यावा. देवावर अढळ श्रद्धा ठेवावी, आपली‎योग्यता सतत वाढवत राहावी. वयाच्या टप्प्यावर कोणती कामे करावीत‎अन् कोणती करू नयेत, याकडे लक्ष द्यावे.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *