अयोध्येतील श्रीराम मंदिरातून झालेली कथित चोरी अभूतपूर्व आहे. या घटनेने भाजप आणि संघाचे कार्यकर्ते व समर्थकही हादरले आहेत. हे केवळ एखाद्या सामान्य मंदिरातील चोरीचे प्रकरण नाही. पूजास्थळी चोऱ्या होणे ही गोष्ट नवीन नाही आणि अनेकदा लोक ती सहनही करतात. पण राम मंदिर वेगळे आहे. येथील अर्पणाची रक्कम खूप मोठी होती. दिल्लीजवळ राहणाऱ्या त्या शेतकऱ्याप्रमाणेच लाखो लोक असतील. तो खिन्न स्वरात म्हणालास, मंदिर उघडल्यानंतर मी दर्शनासाठी गेलो होतो, तेव्हा मी माझे सोन्याचे कडे अर्पण केले होते. त्याची त्या वेळी किंमत किमान अडीच लाख रुपये होती.’ त्या अर्पणामागे एक भावना होती. ही फसवणुकीची भावना केवळ आर्थिक नुकसानापुरती मर्यादित नाही. त्याकडे श्रद्धेचा विश्वासघात म्हणून पाहिले जाते, तेव्हा ती अधिक अस्वस्थ करते. आणि जेव्हा हे अर्पण अशा प्रभू रामचंद्रांच्या नावावर केलेले असते. लोकांची अफाट श्रद्धा आहे, तेव्हा ही भावना अधिक तीव्र होते. 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते दिल्ली अशी प्रसिद्ध रथयात्रा सुरू केली होती आणि बिहारमध्ये त्यांना अटक झाली होती, तेव्हा श्रीराम मंदिर निर्माणाच्या विचाराने उत्तर आणि पश्चिम भारतात कशा प्रकारच्या भावना जागृत केल्या होत्या, हे आपण विसरू शकत नाही. संघ, भाजपच्या अनेक लोकांनी याला देशातील ‘आध्यात्मिक पुनर्जागरणाची’ सुरुवात म्हटले होते. लाखो हिंदूंसाठी राम मंदिराचे निर्माण म्हणजे त्यांच्या अस्मितेच्या पुनर्स्थापनेसाठी चाललेल्या ‘५00 वर्षांच्या संघर्षाची’ परिणती होती. अशा स्थितीत जेव्हा हे समजते की, यामागे ‘नोट आणि वोट’चा संघर्ष होता, तेव्हा जीवनातील भ्रमनिरासाची अशी वेदनादायक जाणीव क्वचितच दुसरी असू शकेल. संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी (खाजगी चर्चेत) या प्रकरणाला 19५1 मध्ये भारतीय जनसंघाच्या स्थापनेनंतरची सर्वात मोठी घटना म्हटले आहे. संघाच्या विचारसरणीशी तुम्ही सहमत असा किंवा नसा, पण दुष्काळ, पूर, त्सुनामी किंवा कोणत्याही राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी त्यांच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कार्यामुळे समाजाच्या अनेक वर्गांत त्यांना आदर मिळत आला आहे. जयपूरमधील एका गावातील एका पॅथॉलॉजिस्टने, ते संघ आणि भाजपचे समर्थक आहेत, मला म्हटले, “भाजप एक राजकीय संघटना आहे, त्यामुळे तिथे अशी घटना घडली तर ती काही प्रमाणात समजू शकते, पण संघात...!” इतके बोलून त्यांनी वाक्य अपुर्ण सोडले, पण त्यांची अस्वस्थता आणि निराशा स्पष्ट होती. या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे बहुतांश सदस्य एकतर संघाचे प्रचारक होते किंवा त्याशी संबंधित होते, हे तथ्य स्वाभाविकपणे या संघटनेची अस्वस्थता अधिक वाढवते. असा गौप्यस्फोट अशा वेळी होणे संघासाठी सोयीचे नाही, जेव्हा ते आपल्या अस्तित्वाच्या 100 वर्षांचा उत्सव साजरा करत आहेत आणि त्यांनी ‘नव्या माणसाच्या निर्मितीचे’ ध्येय ठेवले आहे. अलीकडच्या महिन्यांत संघाचे नेतृत्व अशा सामाजिक वर्गांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. वास्तविक त्यांच्याशी पूर्वी त्यांचा संपर्क नव्हता. अशा स्थितीत जनक्षोभ पाहून संघ आणि भाजप आता ‘डॅमेज-कंट्रोल’च्या स्थितीत आहेत, यात नवल नाही. सुरुवातीच्या संकोचानंतर संघ नेतृत्वाने या घटनेचा निषेध केला आहे. पैशाच्या कथित गैरवापराबाबत चिंता व्यक्त करत संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी या घटनेचा धिक्कार केला आहे आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ट्रस्टच्या अलीकडील बैठकीत, जबाबदारी निश्चित करण्यासाठी एका व्यावसायिक सीईओची नियुक्ती करण्यासह आवश्यक प्रक्रिया लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ट्रस्टच्या बैठकीत सरचिटणीस चंपत राय (ते संघ प्रचारक आहेत आणि अनेक वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेशी जोडलेले आहेत) विश्वस्त अनिल मिश्रा आणि आमंत्रित सदस्य गोपाल राव यांचे राजीनामे स्वीकारले गेले. हे राजीनामे एसआयटीच्या अंतरिम अहवालानंतर आणि चंपत राय यांच्या माजी ड्रायव्हरसह आठ जणांच्या अटकेनंतर घेतले गेले. मात्र, एसआयटीच्या अंतरिम अहवालात आश्चर्याची गोष्ट म्हणजे चंपत राय यांचे नाव नाही. चंपत यांनी म्हटले आहे की, अंतिम अहवाल आल्यानंतरच ते आपली बाजू मांडतील. या संपूर्ण घटनाक्रमाचा संघाच्या प्रतिमेला धक्का लागला आहे, हे स्पष्ट आहे. यामुळे ‘हिंदुत्व प्रकल्पा’बद्दलही लोकांचा भ्रमनिरास होऊ शकतो, अशी भीती त्यांना वाटते. अयोध्येच्या मुद्द्यावर नाराज असलेले मतदार आपोआप विरोधी पक्षांकडे वळतील, असे मानणे योग्य ठरणार नाही, जरी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपवर हल्लाबोल करण्यास अजिबात उशीर केला नाही. परंतु, अयोध्या कधीच विरोधी पक्षांचा मुद्दा राहिला नसल्याने, भाजपचे अनेक समर्थक निवडणुकीच्या वेळी घरी बसण्याचा निर्णयही घेऊ शकतात. पण याचा फायदाही शेवटी विरोधी पक्षांनाच होईल.हा मुद्दा उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय स्तरावरील राजकीय चर्चा बदलू शकेल का? आतापर्यंत विरोधकांना हेच उमजलेले नाही की, राम मंदिराच्या भोवती निर्माण झालेल्या भाजपच्या ‘हिंदू राष्ट्रवादाच्या’ मुद्द्याचा सामना कसा करायचा. राम मंदिर हा भाजपचा असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बनला, ज्याने त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवले. यातून झालेल्या हिंदू एकीकरणाने पक्षाला भारताच्या मोठ्या भागात विस्तार करण्यास मदत केली. संघ आणि भाजप याला ‘हजार वर्षांचा सभ्यताविषयक प्रकल्प’ म्हणून मांडत आले आहेत.आता बरेच काही योगी आदित्यनाथ काय निर्णय घेतात, यावर अवलंबून असेल. तरी तांत्रिकदृष्ट्या ते ट्रस्टच्या व्यवस्थापनाशी जोडलेले नाहीत तरीही ते उत्तर प्रदेशातील भाजप सरकारचे प्रमुख आहेत. सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यानंतर योगी पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये समाविष्ट होऊ शकतात. परंतु भाजप उत्तर प्रदेशात हरली किंवा केवळ अल्प मताधिक्याने सत्तेत परतली, तर त्यांचा दावा कमकुवत होऊ शकतो. तरीही, संघातील अनेक लोक त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांचा प्रभाव केवळ उत्तर प्रदेशापर्यंत मर्यादित नाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) ठकवल्याची भावना केवळ आर्थिक नुकसानापुरती मर्यादित नाही. त्याकडे श्रद्धेचा विश्वासघात म्हणून पाहिले जाते, तेव्हा ती अस्वस्थ करते. प्रभू रामचंद्रांवरील अपार श्रद्धेतून केलेले दान असल्याने ही भावना अधिक गहिरी होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पिसोळीत डंपरची दुचाकीला धडक; दोन विद्यार्थी गंभीर जखमी! 🚛💥⚠️
CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांची नोटीस; आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका! 🇮🇳⚖️
हडपसरमध्ये २० वर्षे जुनं झाड कोसळलं; सुदैवाने जीवितहानी टळली! 🌳⚠️
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




