सट्टेबाजी आणि जुगार रोखण्यासाठीकायदा बनवण्याचा अधिकार केंद्रसरकारकडेच नाही. केंद्र सरकारनेऑगस्ट २०२१ मध्ये दिल्ली उच्चन्यायालयात म्हटले होते की, याबाबतकायदा बनवण्याचा अधिकार राज्यसरकारांकडे आहे.
दिल्लीमध्ये आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीवरअत्याचार आणि हत्येमधील आरोपी नोकर ऑनलाइनगेमिंगच्या व्यसनामुळे ७ लाख रुपयांच्या कर्जाच्याजाळ्यात अडकला होता. एम्स आणि इहबासच्याडॉक्टरांच्या मते, गेमिंग डिसऑर्डर आणि व्यसन यांच्याएकत्र परिणामामुळे नैराश्य, चोरी, फसवणूक, पोर्नोग्राफीव इतर गुन्हे वाढत आहेत. लोकांना ऑनलाइन गेमिंगच्यामहामारीपासून वाचवण्यासाठी गेल्या वर्षी संसदेतकायदा केला होता. त्यानुसार १ मेपासून नवे नियम लागूहोतील. पण यामुळेही ऑनलाइन जुगार व सट्टेबाजीचीकीड संपणार नाही. या संबंधित ५ मुद्दे समजून घेऊ- १. संविधानाच्या सातव्या अनुसूचीप्रमाणे सट्टेबाजीआणि जुगार रोखण्यासाठी कायदा बनवण्याचाअधिकार केंद्राकडेच नाही. केंद्राने ऑगस्ट २०२१ मध्ये दिल्ली हायकोर्टात म्हटले होते की, याबाबत कायदा बनवण्याचा अधिकार राज्यांकडे आहे. तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड व राजस्थान यांनी या समस्येवर नियंत्रणासाठी कायदा बनवण्याची सुरुवातकेली होती. राज्यांसोबत मिळून तरुणांना गेमिंगच्या व्यसनातून मुक्त करण्याऐवजी आयटी नियमांमध्ये बदलव ॲडव्हायजरीच्या नावाखाली केंद्र सरकार उलटगेमिंग कंपन्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देत आहे. २. २०२२ मध्ये ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफइंडियाने १८ वर्षांखालील मुलांबाबत ॲडव्हायजरी जारीकेली होती. पण नव्या नियमांत मुलांना पैशांच्या व्यवहारअसलेल्या गेम्सपासून दूर ठेवण्याबाबत स्पष्ट तरतुदीनाहीत. २०२३ मध्ये डीपीडीपी कायद्यानुसार कंपन्यामुलांच्या डेटाचा व्यावसायिक वापर करू शकत नाहीत. ३. डेटा परदेशात जाणे थांबवण्यासाठी आणि राष्ट्रीयसुरक्षा वाढवण्यासाठी २०२० मध्ये टिकटॉक आणिपबजीसारख्या १७७ चीनी ॲप्सवर सरकारने बंदीघातली होती. ईडीच्या तपासात चीनी गेमिंग ॲपच्याम्यूल खात्यांमधून सायबर गुन्ह्यांना प्रोत्साहन आणिक्रिप्टोच्या माध्यमातून हजारो कोटींच्या हवालाव्यवहारांचा खुलासा झाला होता. गेमिंग चॅटमधूनतरुणांना कट्टरपंथ आणि दहशतवादाशी जोडले जातआहे. नियंत्रणाच्या नियमांमध्ये कठोर शिक्षा नाही. ४. परदेशातून चालवल्या जाणाऱ्या गेमिंग कंपन्याहजारो कोटींचा बेकायदा व्यवसाय करण्यासोबत मोठ्याप्रमाणात करचोरीही करत आहेत. बक्षीस रकमेवर ५८हजार कोटींची आयकर चोरी आणि २.५० लाखकोटींच्या जीएसटी चोरीची प्रकरणे न्यायालयात प्रलंबितआहेत. कौशल्याधारित खेळांच्या जुन्या वर्गीकरणालासंपवून ई-स्पोर्ट्सच्या आडून मनी गेमिंग ॲप्सलाप्रोत्साहन दिले जाते. या विरोधाभासाचा फायदा गेमिंगकंपन्या घेऊन हजारो कोटींचा करभरणा टाळतात. ५. सरकारच्या पीआयबी नोटमध्ये ऑनलाइन सट्टेबाजी,जुगार, लॉटरी, फँटसी स्पोर्ट्स, पोकर आणि रमीसारख्याकार्ड गेम्सवर बंदी घालण्याचा दावा करण्यात आलाहोता. नव्या नियमांमध्ये रिअल मनी गेमिंगवर बंदीबाबतगोलमोल बोलण्यात आले आहे. प्रश्न असा आहे की,नव्या नियमांमुळे ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगारावरबंदी लागली आहे की नाही? बंदी लावली नाही तरसरकार राज्यांसोबत मिळून प्रभावी कायदा का बनवतनाही? निर्बंध लागू झाल्यास राज्यांशी संबंधित विषयावरकेंद्राने कोणत्या घटनात्मक अधिकाराने कायदा बनवला,हे सांगितले पाहिजे. विधी आयोगाने म्हटले होते की, कठोर कायदा असतातर युधिष्ठिराने आपल्या भावांना आणि पत्नीला पणालालावले नसते. सोशल गेम आणि ई-स्पोर्ट्सच्या आडूनमनी गेमिंग आणि सट्टेबाजीच्या आजाराला कायदेशीरप्रोत्साहन दिल्याने मुलांचे भविष्य धोक्यात येण्यासोबतअर्थव्यवस्थेचा पाया कमकुवत होऊ शकतो। (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



