दिवाळीचे दिवे आपल्या घरांना आणि गल्ल्यांना उजळण्याआधीच दुकाने, बाजार आणि इमारतींवर लावलेल्या शोभिवंत दिव्यांनी देशभरात रोषणाई पसरवण्यास सुरुवात केली आहे. रंगीबेरंगी प्रकाश सण येण्याआधीच या ‘रोषणाईच्या उत्सवाचे’ आगमन जाहीर करतो. या जादूचे श्रेय विजेला जाते. पण आपण या उत्कृष्ट सेवेच्या इतके आहारी गेलो आहोत का, की निष्काळजीपणे वापरल्यास ती किती धोकादायक ठरू शकते हेही आपण विसरलो आहोत? नुकत्याच घडलेल्या दोन घटनांनी मला हा प्रश्न विचारण्यास भाग पाडले आहे. बेंगळुरूतील एका पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये संशयित विद्युतप्रवाह उतरल्याने दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. पूलमधील पाण्यात उतरताच एक जण किंचाळला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या दुसऱ्या व्यक्तीलाही शॉक लागला. मदतीसाठी पोहोचलेला पूल अटेंडंट व एक पाहुणा यांनाही विजेचे झटके बसले. आराम देणारी जागा अचानक मृत्यूची जागा बनली. दुसऱ्या एका घटनेत हैदराबादजवळ भातशेतीभोवती लावलेल्या विजेच्या बेकायदा तारांच्या संपर्कात आल्याने 20 वर्षांच्या दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. रानडुकरांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्याने या तारा लावल्या होत्या. हे दोघे तरुण वाढदिवस साजरा करणाऱ्या मित्रांच्या गटात होते. पोलिसांची गस्तीची गाडी पाहून ते शेतात पळाले होते. या दोन्ही दुर्दैवी घटनांची परिस्थिती वेगळी होती. पण एक गोष्ट समान होती- वीज, किंवा ती वापरण्याची माणसांची पद्धत. एका रात्रीचे 20 ते 25 हजार रुपये भाडे आकारणारे आणि शेकडो पाहुण्यांचे स्वागत करणारे हॉटेल आपल्या स्विमिंग पूलला विजेच्या धोक्यापासून असुरक्षित कसे ठेवू शकते? अशा ठिकाणांच्या विजेच्या सुरक्षेची तपासणी कोण आणि किती वेळा करते? आग सुरक्षेच्या तपासणीप्रमाणे विजेच्या सुरक्षेचेही वेळोवेळी ऑडिट व्हायला नको का? दुसरी घटना अधिक कठीण प्रश्न उपस्थित करते. एखादी व्यक्ती शेताभोवती विजेची उघडी तार कशी काय लावू शकते? खरे तर तिला ठाऊक असते की याला स्पर्श केल्यास कुणाचाही जीव जाऊ शकतो? प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करणे म्हणजे अशी जीवघेणी कुंपणे घालण्याचा परवाना मिळणे आहे का? याला कोण परवानगी देते आणि शेतीसाठी दिलेली वीज चुकीच्या पद्धतीने वापरली जात नाही ना, हे कोण सुनिश्चित करते? आपण स्वतःलाही एक प्रश्न विचारला पाहिजे. आपण आपली घरे, रस्ते, उद्योग आणि शेतांसाठी जंगले, कुरणे आणि प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास हिरावून घेतले आहेत. एकेकाळी मोकळे फिरणारे प्राणी अन्नाच्या शोधात आता शेतात घुसत आहेत. त्यांच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनी बळकावल्यानंतर आता ते त्यांच्या जुन्या अधिवासात परत आले तर त्यांना मारण्याचा हक्क आपल्याला आहे, असे आपण मानतो का? ही विचारसरणी आपल्याला कुठे घेऊन जात आहे. रानडुक्कर मारण्यासाठी लावलेली तार आपल्याच मुलांचा जीव घेऊन गेली. शोकांतिका अशी की, या तारा पीक उद्ध्वस्त करणारा प्राणी आणि चुकून त्याला स्पर्श करणारा माणूस याच्यात फरक करू शकत नाहीत. कदाचित आता वेळ आली आहे की आपण या विविध घटनांच्या पलीकडे जाऊन विजेचा पुरवठा आणि वापर कसा होत आहे हे पाहिले पाहिजे. यासाठी एक स्पष्ट कायदेशीर चौकट नको का? यात विजेचा अधिकृत वापर, अनिवार्य सुरक्षा साधने, तपासणी आणि गैरवापराची जबाबदारी निश्चित करायला हवी. वीज मंडळे, स्थानिक संस्था, कृषी विभाग आणि इमारत नियमन प्राधिकरणांनी एकत्र काम केले पाहिजे. विजेचे बेकायदेशीर कुंपण घालणे ही सामान्य शेतीची पद्धत मानली जाऊ नये. कोणत्याही हॉटेलच्या स्विमिंग पूलची विजेची सुरक्षा केवळ व्यवस्थापनाच्या आश्वासनावर सोडली जाऊ शकत नाही. आपल्याकडे पाणी, रस्ते, फटाके आणि धोकादायक पदार्थांसाठी नियमन करणारे कायदे आहेत. मग एका क्षणात कुणाचाही जीव घेऊ शकणारी वीज, पॉवर कंपनीच्या मीटरच्या बाहेर पडताच इतक्या निष्काळजीपणे का वापरली जावी? फंडा असा की- वीज ही एक सेवा आहे. त्यासाठी आपण पैसे देतो. कुणाचा जीव धोक्यात घालण्याचा तो परवाना नाही. पुन्हा एखादा स्विमिंग पूल, शेत किंवा निष्पाप व्यक्ती याचा बळी ठरण्याआधी आपण ऊर्जेवर नियंत्रण मिळवायला शिकलो आहोत. तिचा आदर करणेही शिकायला नको का?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
- नाशिक: सिंहस्थ ध्वजारोहणावर २० कोटींचा खर्च; अडीच कोटींचे हेलिपॅड उभारूनही व्हीआयपींनी रस्त्याने प्रवास केल्याने चर्चांना उधाण
- नाशिक: मालेगाव तालुक्याच्या घशाला पडली कोरड; १२५ गावे आणि ५८ वाड्यांना पाणीटंचाईची तीव्र धग
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: जिल्हा बँक निवडणुकीत खासदार नीलेश लंके विजयी, आमदार पराभूत
- सिंधुदुर्ग: अभिमानास्पद क्षण! आचऱ्याच्या शिल्पा गावकर-डोंगरेची राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
- पुणे: पुण्यात विवाहितेची आत्महत्या; घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांकडून महर्षीनगर येथील 'झांबरे पॅलेस'ची तोडफोड, परिसरात तणाव
- सातारा: जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ९७.९२ टक्के चुरशीने मतदान! खंडाळ्यात तुफान राडा, उद्या निघणार निकाल
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा





























Subscribe to my channel




