आपल्यापैकी अनेकांनी वैद्यकीय परिस्थितीवर आधारित एखादा चित्रपट किंवा मालिका नक्कीच पाहिली असेल. यात बाळंतपणानंतर स्त्रीला अचानक ‘पोस्टपार्टम हॅमरेज’ (पीपीएच) होतो. म्हणजेच प्रचंड रक्तस्राव सुरू होतो. ही स्थिती जीवघेणी ठरू शकते. ‘ग्राम चिकित्सालय’ ही अशीच एक मालिका आहे. या मालिकेत प्रभात नावाचा एक तरुण, हुशार व ध्येयवादी डॉक्टर झारखंडमधील ‘भटकंडी’ या दुर्गम उपेक्षित प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी स्वीकारतो. तेथे गरजेचे बदल घडवून आणण्यासाठी तो ठाम असतो. पण इतर काही बदलण्यापूर्वी त्याला आधी स्वतःमध्येच बदल करावा लागेल याची जाणीव त्याला तिथे होते. अशा मालिकांमध्ये कलाकार दिग्दर्शकाने सांगितलेली भूमिका वठवतात आणि लेखकाने लिहून दिलेले संवाद बोलतात. आपल्यासमोर अशी काही परिस्थिती आली तर आपणही तसेच वागू, अशी आपलीही इच्छा असते. पण महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील ‘घोडनकप्पी’ या दूरवरच्या आदिवासी पाड्यातील तुळशीराम गेडाम या रहिवाशाने केलेल्या गोष्टीचा विचार कोणत्याही लेखकाने किंवा दिग्दर्शकाने कधी पडद्यावर दाखवण्यासाठी केला नसेल. यालाच एका तरुण बापाचे ‘खरे शहाणपण’ म्हणतात. शहाणपण ही नेहमी वयानुसारच येते असे नाही, हेच त्यांनी सिद्ध केले. अनेकदा ही परिपक्वता खोल आघात झाल्यावर येते. यातून माणसाचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. 14 जून रोजी गरोदरपणाच्या 33 व्या आठवड्यात (सामान्यपणे बाळंतपण 40 व्या आठवड्यात होते) तुळशीराम यांच्या 25 वर्षांच्या पत्नी संगीता यांनी घरीच एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्यांना पीपीएचचा त्रास सुरू झाला. कुटुंबाने तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधला. जिथपर्यंत पोहोचणे शक्य होते तिथपर्यंत म्हणजेच गावाजवळील टेकडीपर्यंत तातडीने रुग्णवाहिका पाठवण्यात आली. नातेवाईक त्या महिलेला घेऊन खडतर रस्त्यांवरून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत राहिले. या संघर्षात वैद्यकीय भाषेत ज्याला ‘गोल्डन अवर’ म्हणतात, तो अत्यंत महत्त्वाचा वेळ निघून गेला. संगीता यांच्यावर उपचार सुरू होण्यापूर्वीच प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. सुमारे 2.2 किलो वजनाच्या नवजात बाळाची प्रकृती मात्र स्थिर असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रसंगी अनेक लोक तिथेच थांबले असते. काहींनी सरकारला दोष दिला असता. काहींनी विरोध केला असता, काहींनी भरपाई मागितली असती. काही जण स्वाभाविकपणे दुःखात बुडून घरी निघून गेले असते. पण तुळशीराम यांनी एक वेगळा आणि अत्यंत कठीण मार्ग निवडला. आपल्या कुटुंबावर आलेली वेळ इतर कोणत्याही कुटुंबावर येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला. हा विचार अत्यंत खोल आहे. आपले वैयक्तिक दुःख समाजाच्या भल्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी एका विशेष परिपक्वतेची गरज असते. जेव्हा हे दुःख सहन करणारी व्यक्ती खूप तरुण असते तेव्हा ही गोष्ट अधिक कौतुकास्पद ठरते. तुळशीराम यांच्याकडे वेळेची अनुकूलता नाही. आरामदायी आयुष्य नव्हते. त्यांना दोन लहान मुलांचा सांभाळ करायचा आहे. शिवाय अशी जबाबदारी वाटून घेणाऱ्या जोडीदाराला त्यांनी गमावले आहे. दुःखात बुडून राहण्यासाठी त्यांच्याकडे प्रत्येक कारण उपलब्ध आहे. पण असे असूनही त्यांनी इतर कोणाच्या तरी पत्नीचा, कोणाच्या तरी बाळाचा आणि कोणाच्या तरी आपत्कालीन परिस्थितीचा विचार करण्यास सुरुवात केली. खरे शहाणपण इथूनच सुरू होते. रस्ता हा केवळ एक रस्ता नसतो हे तुळशीराम यांच्या लक्षात आले. घोडनकप्पी येथील 20 कुटुंबांसाठी हा रस्ता रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचे एक माध्यम आहे. हा रस्ता एखाद्या गरोदर महिलेची सुरक्षा आहे. एखाद्या मुलाचा शाळेचा मार्ग आहे आणि एखाद्या वृद्धाचा स्वाभिमान आहे. आपत्कालीन परिस्थिती आणि दुर्दैवी अपघात यातील फरक म्हणजे हा रस्ता आहे. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने मुख्य रस्त्यापर्यंत 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरू केले. स्वेच्छेने केलेल्या श्रमदानातून 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून हे काम सुरू झाले. आता रस्त्याचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. फंडा असा की- आपण अनेकदा शहाणपणाचा संबंध पांढरे झालेले केस, अनेक वर्षांचा अनुभव आणि आयुष्याबद्दलची भाषणे यांच्याशी जोडतो. पण कदाचित शहाणपण यापेक्षा खूप सोपे असते. स्वतःच्या दुःखातून शिकणे आणि तेच दुःख दुसऱ्या कुणाच्या नशिबी येऊ नये याची काळजी घेणे म्हणजेच खरे शहाणपण होय.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पिसोळीत डंपरची दुचाकीला धडक; दोन विद्यार्थी गंभीर जखमी! 🚛💥⚠️
CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांची नोटीस; आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका! 🇮🇳⚖️
हडपसरमध्ये २० वर्षे जुनं झाड कोसळलं; सुदैवाने जीवितहानी टळली! 🌳⚠️
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




