जवळपास संपूर्ण देश उष्णतेच्या लाटेचा सामना करतोय. प. राजस्थानच्या फलोदीत तापमान 45.2 अंश सेल्सियसवर पोहोचले, तर मध्य भारतातील भोपाळमध्येही गुरुवारी तापमान 43 अंशांहून अधिक होते. अशा वेळी आपण आइस्क्रीम आणि दही यासारख्या थंड पदार्थांकडे वळणे स्वाभाविक आहे. पण तुम्ही आरोग्याबाबत जागरूक असाल आणि दही हे आइस्क्रीमपेक्षा चांगले आहे असे मानत असाल, तर मी तुम्हाला ‘ईट युअर आइस्क्रीम’ हे पुस्तक वाचण्याचा सल्ला देईन. कपाटातील अनेक पुस्तकांपैकी एक मानून याकडे दुर्लक्ष करू नका. हे पुस्तक डॉ. एजेकील इमॅन्युएल यांनी लिहिलेय. ते अमेरिकन ऑन्कोलॉजिस्ट आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियामध्ये वरिष्ठ प्राध्यापक आहेत. ते आरोग्य धोरण व बायोएथिक्सचे जागतिक स्तरावरील तज्ज्ञ, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांचे विशेष सल्लागार आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या प्रशासनात प्रमुख आरोग्य धोरण सल्लागारही होते. त्यांच्या प्रोफाइलमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते विज्ञानाशी जोडलेले व्यक्ती आहेत. इमॅन्युएल हेल्दी फॅट्स, फायबर, आंबवलेले पदार्थ, मर्यादित प्रमाणात प्रथिने आणि घरगुती अन्नाचे कौतुक करतात. त्यांच्या पुस्तकाचे शीर्षक त्या संशोधनाला सन्मान देते, ज्यात असे आढळले की प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि इमल्सीफायर नसलेले चांगल्या दर्जाचे आइस्क्रीम खाल्ल्याने टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. 2014 मध्ये हार्वर्डच्या 1.50 लाखांहून अधिक लोकांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की दही आणि आइस्क्रीमने टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी केला आहे. इमॅन्युएल म्हणतात की, संशोधकांना असेही आढळले की टाइप-2 मधुमेहाच्या प्रतिबंधासाठी आइस्क्रीम हे दह्यापेक्षा जास्त प्रभावी आहे. इमॅन्युएल म्हणतात की वेगाने वाढणाऱ्या वेलनेसच्या विचित्र पद्धती आणि त्या विकणाऱ्या भोंदू लोकांमुळे ते खूप वैतागले आहेत. उंदरांवर प्रयोग केलेल्या आणि माणसांकडून वापरल्या जाणाऱ्या गोळ्या खरेदी करणाऱ्यांना ते विचारतात की, तुमच्याकडे शेपूट आणि मिशा आहेत का, जे तुम्ही हे खात आहात? आपल्यापैकी बहुतांश लोक आरोग्याबद्दल गरजेपेक्षा जास्त विचार करतात- या विषयावर जगातील अनेक लोक त्यांचा सल्ला मागतात. जेव्हा लोक त्यांना विचारतात की ते कोणता आहार घेतात, तेव्हा त्यांचे उत्तर असते की, मी फक्त एका सामान्य माणसासारखे खातो. त्यांचे नवीन पुस्तक ‘ईट युअर आइस्क्रीम : सिक्स सिम्पल रुल्स फॉर लाँग अँड हेल्दी लाइफ’ सांगते की आरोग्याचा अर्थ असा नसावा की त्यात सतत एखाद्या गोष्टीची कमतरता भासावी, तसेच यामध्ये तुमचा सर्व वेळ आणि पैसा खर्च होऊ नये. ते आरोग्य सुधारणाऱ्या खालील सवयी अंगीकारण्याचा आणि आनंदाने जगण्याचा सल्ला देतात. 1. मूर्ख बनू नका : हा स्पष्ट निर्देश सांगतो की मुद्दाम गंभीर नुकसान होण्याचा धोका टाळा. या यादीत स्मोकिंग, वेपिंग, मद्यपान, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, ड्रायव्हिंग करताना मेसेज करणे, सुट्ट्या न घेणे आणि कॅन्सर स्क्रीनिंग टाळणे यांचा समावेश आहे. 2. संवाद साधा : आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदासाठी कुटुंब, मित्र आणि सामाजिक संवाद या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ते म्हणतात की अनोळखी लोकांशीही बोला. 3. मनाने तीक्ष्ण राहा : त्यांचा दोन शब्दांचा सल्ला आहे- ‘डोंट रिटायर’. जर नोकरीतून निवृत्त झाला असाल तर घरी जास्त काम करा. कारण रिकामे बसल्याने विचाराच्या क्षमतेवर परिणाम होतो. जरी मानसिक क्षमता बऱ्याच अंशी जनुकांवर अवलंबून असली तरी जेव्हा लोक काम सोडतात तेव्हा जीवनशैलीचाही फरक पडतो. ते म्हणतात की, निवृत्तीनंतर स्वतःला टीव्ही आणि बैठे काम असलेल्या जीवनापुरते मर्यादित करू नका. 4. आइस्क्रीम खा : दुग्धजन्य पदार्थ, विशेषतः आइस्क्रीमच्या फायद्यांबाबतचे संकेत मजबूत आहेत. ते म्हणतात, ‘सेल्फ पनिशमेंट मॉडेल’ हा जीवनासाठी चुकीचा मार्ग आहे. 5. चालत-फिरत राहा : तुम्ही नियमित व्यायाम करत नसलात तरी चालणे, सायकल चालवणे सुरू ठेवा. जंगलात लांबच्या प्रवासासाठी पायी जा. इमॅन्युएल स्वतः सायकल चालवतात आणि योग करतात. 6. झोपेला महत्त्व द्या : झोपण्यासाठी योग्य वातावरण तयार करा. रात्री 10:30 वाजेपर्यंत झोपणे चांगले आहे. झोपण्यापूर्वी एक तास आधी पुस्तक वाचा.फोन किंवा टीव्ही पाहणे बंद करा. फंडा हा आहे की जर तुमचे पूर्वज 90 वर्षांपर्यंत निरोगी राहिले असतील तर निरोगी जीवन जगण्यासाठी फक्त त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
- पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
- पुणे: तात्काळ आंदोलनस्थळ रिकामे करा; पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनाविरोधात नागरिक पोहोचला उच्च न्यायालयात; हायकोर्टाकडून प्रशासनाला आणि आयोजकांना कारणे दाखवा नोटीस जारी
महाराष्ट्र
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
- पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!
- कोल्हापूर: बाळूमामा देवस्थान ट्रस्ट गैरव्यवहारप्रकरणी मोठा खुलासा; एसआयटीकडून सहावा एजंट सागर पाटील अटकेत!
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर
























Subscribe to my channel




