अजित पवारांच्या प्रेमकोर्ट बंगल्यावरील विलीनीकरणाच्या चर्चेत सुनील तटकरेही? खरं काय आणि खोटं काय? VIDEO

image

Merger Buzz at Ajit Pawar’s Premcourt Bungalow: Was Sunil Tatkare Present?अजित पवार यांचे बारामतीत विमान दुर्घटनेत निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. स्वतः शरद पवार यांनी देखील यावर भाष्य करत सांगितले होते की जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय झाला होता. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, तसेच आमदार जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही दुजोरा दिला होता. मात्र अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी विलिनीकरणावर कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथील अजित पवार यांच्या प्रेमकोर्ट या बंगल्यामध्ये या सर्व नेत्यांची चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे हे उपस्थित होते, अशी माहिती राजकीय वर्तुळातील सूत्रांकडून मिळाली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *