
Pune : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात एक काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं खळबळ उडाली आहे. पतीकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला आणि मानसिक त्रासाला वैतागून एका 30 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन निष्पाप मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. मृतांमध्ये सहा वर्षांचा मुलगा आणि अवघ्या चार महिन्यांच्या तान्ह्या मुलीचा समावेश आहे. या गंभीर प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पतीला गजाआड केलं आहे. अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय 30, आई), सार्थक राजू जाधव (वय 6, मुलगा) आणि गौरी राजू जाधव (वय 4 महिने, मुलगी) अशी मृतांची नावं असून राजू पांडुरंग जाधव (वय 32) अटक केलेल्या पतीचं नाव आहे.
मुलांना आणि सोबत सायकल घेऊन घर सोडले
मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील असलेले हे जाधव कुटुंब पोटापाण्यासाठी पाबळ येथील एका वीटभट्टीवर कामाला होते. मात्र, पती राजू आणि पत्नी भाग्यश्री यांच्यात सातत्याने खटके उडत होते. काल रविवारी सकाळीही त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. या रोजच्या कटकटीने मनातून खचलेल्या भाग्यश्रीने रागाच्याभरात दोन्ही मुलांना आणि सोबत सायकल घेऊन घर सोडले. दुपार उलटून गेली तरी पत्नी आणि मुले घरी न परतल्याने पती राजूने त्यांची शोधाशोध सुरू केली. घरापासून काही अंतरावर असलेल्या परमेश्वर पिंगळे यांच्या विहिरीच्या काठावर त्याला मुलांची सायकल आणि चपला दिसल्या. यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पाहिले असता, तिघांचेही मृतदेह पाण्यात आढळून आले.
|
|
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृत भाग्यश्री यांची बहीण जयश्री जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पोलिसांनी पती राजू पांडुरंग जाधव याच्याविरुद्ध पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. एका क्षुल्लक वादातून आणि संसारातील कलहातून दोन निष्पाप जीवांचा आणि एका मातेचा बळी गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिक्रापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शहर
- पुणे: सुपे-चौफुला मार्गावर दुचाकी घसरून थेट ट्रकखाली आल्याने दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू
- पुणे हवामान अंदाज: शहरात पुढील दोन दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता, ढगाळ वातावरण कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज"
- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! जोगेश्वरीच्या 'शिल्पग्राम'चा होणार कायापालट; आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'मुंबई हाट' सांस्कृतिक केंद्र उभारणार"
- अहमदनगरमध्ये नीट परीक्षेचा धक्कादायक निकाल; पुनर्परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, परीक्षेच्या तणावातून उचलले टोकाचे पाऊल
महाराष्ट्र
- पुणे: सुपे-चौफुला मार्गावर दुचाकी घसरून थेट ट्रकखाली आल्याने दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू
- पुणे हवामान अंदाज: शहरात पुढील दोन दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता, ढगाळ वातावरण कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज"
- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! जोगेश्वरीच्या 'शिल्पग्राम'चा होणार कायापालट; आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'मुंबई हाट' सांस्कृतिक केंद्र उभारणार"
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
गुन्हा
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा


























Subscribe to my channel




1 thought on “Pune Crime : नवऱ्याच्या सततच्या त्रासाला कंटाळा; दोन चिमुकल्यांसह विवाहितेने आयुष्य संपवलं, पुण्यात हळहळ”