पाकिस्तान सध्या अत्यंत गंभीर संकटांनी घेरलेलाआहे. देशाची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडलीआहे. राजकीय अस्थिरता कायम आहे.बलुचिस्तानमध्ये बंडखोरी वाढत आहे. खैबरपख्तूनख्वामध्ये ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान''चे(टीटीपी) हल्ले वाढले आहेत, तर पाकव्याप्तकाश्मीरमध्येही लोकांचा असंतोष समोर येऊ लागलाआहे. मग पाकिस्तान आता फुटण्याच्या किंवा तुकडेहोण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे का? पाकिस्तानपुढील सर्वात मोठे खरे आव्हान त्याच्यासंघराज्य व्यवस्थेचे आहे. हा देश अनेक भाषा, वांशिकगट व प्रादेशिक अस्मितांनी मिळून बनला आहे. एवढ्या विविधतेने नटलेल्या समाजाला एका धाग्यात बांधण्याचे काम तिथल्या लोकशाही संस्थांपेक्षा सैन्यानेच जास्तकेले आहे. परंतु कोणत्याही देशाची एकतेसाठी जनतेचा विश्वास आणि राजकीय संमती आवश्यक असते.आज बलुचिस्तानमधील नागरिक आपल्या राजकीय हक्कांची मागणी करत आहेत. खैबर पख्तूनख्वा भाग दहशतवाद व लष्करी कारवायांमुळे अशांत आहे. सिंध प्रांतात वेळोवेळी प्रादेशिक अस्मितेचा प्रश्न वर डोकेकाढत असतो. दुसरीकडे मुहाजिर समाजही राजकीयप्रतिनिधित्वाबाबत असंतुष्ट आहे. आता पीओकेमध्येहीआर्थिक मुद्द्यांवरून सुरू झालेले जनआंदोलनशासनव्यवस्थेवर आणि इस्लामाबादच्या नियंत्रणावरथेट प्रश्न उपस्थित करू लागले आहे. यापैकी कोणताहीएक मुद्दा पाकिस्तानच्या अखंडतेला लगेचच धोकानिर्माण करू शकत नाही. पण संघराज्यीय रचनेत गंभीरभेगा पडल्याचे ते स्पष्ट संकेत असतात. असे असूनहीपाकिस्तान आजवर कसा काय टिकून आहे? याचेसर्वात मोठे कारण त्याची अंतर्गत ताकद नसून त्याचे‘रणनीतिक महत्त्व'' हे आहे. पाकिस्तानचे भौगोलिकस्थान त्याला दक्षिण आशिया, मध्य आशिया, पश्चिमआशिया व आखाती देशांमधील एक महत्त्वाचा दुवाबनवते. त्याच्याकडे अणुवस्त्रे आहेत. सीमा अत्यंतसंवेदनशील क्षेत्रांशी जोडलेल्या आहेत. याचकारणामुळे जगातील महासत्तांना पाकिस्तानचा पूर्णविनाश किंवा पतन परवडणारे नाही. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने पाकिस्तानला आपलामित्र बनवले होते. अफगाण युद्ध आणि त्यानंतरदहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढ्यातहीपाकिस्तानची उपयोगिता कायम राहिली. आर्थिकसंकटात सापडलेला असतानाही आयएमएफसहअनेकआंतरराष्ट्रीय संस्थांनी त्याला वारंवार आर्थिक मदतकेली. पाकिस्तानला आतापर्यंत आयएमएफकडूनअनेक आर्थिक मदत पॅकेजेस मिळाली आहेत. हे निर्णयकेवळ आर्थिक नव्हते, तर त्यामागे भू-राजकीयकारणेही होती. आज चीन हा पाकिस्तानचा सर्वात मोठारणनीतिक भागीदार आहे. ‘चीन-पाकिस्तान आर्थिककॉरिडोअर'' हा केवळ एक आर्थिक प्रकल्प नसूनचीनच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे. बाहेरीलगुंतवणूक एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेला तात्पुरताआधार देऊ शकते; त्या देशाची राष्ट्रीय एकता निर्माणकरू शकत नाही, हेही तितकेच सत्य आहे. अमेरिकेच्यागरजा आता बदलल्या आहेत. तरीही पाकिस्तान पूर्णपणेअस्थिर व्हावा असे अमेरिकेला वाटत नाही.अणुवस्त्रांची सुरक्षा, दहशतवाद व स्थिरता यांबाबतअमेरिकेला चिंता आहे. दुसरीकडे सौदी अरेबिया आणियूएईसारख्या आखाती देशांसाठीही पाकिस्तान एकमहत्त्वाचा सुरक्षा भागीदार राहिला आहे. वेगवेगळ्याकारणांमुळे अनेक देशांना पाकिस्तानमध्ये रस आहे. परंतु बाहेरील मदत ही पाकिस्तानच्या अंतर्गतसमस्यांवरचा कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही.पाकिस्तानचे नेतृत्व नेहमीच आपल्या अंतर्गत अपयशांचेकायदे आणि दोष बाहेरील देशांवर—विशेषतः भारतावरढकलण्याचा प्रयत्न करते. यामुळे तिथल्या देशांतर्गतराजकारणात काही काळासाठी फायदा मिळू शकतो;परंतु प्रशासन, अर्थव्यवस्था आणि जनतेच्या मूळसमस्या सुटू शकत नाहीत. भारताच्या दृष्टीने सर्वातमहत्त्वाचे हे आहे की, त्याने पाकिस्तानच्याकमकुवतपणावर खूप उड्या मारू नयेत आणि त्यालाकमीही लेखू नये. एक अस्थिर पाकिस्तान भारतासाठीहीनवीन आव्हाने उभी करू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लष्कर आणि परदेशी मदतीच्या जोरावरचालण्याऐवजी पाकिस्तान नागरिकांच्याविश्वासावर उभा असलेला देश बनूशकेल का? याचे उत्तर मिळत नाहीतोपर्यंत त्याची अंतर्गत कमजोरी वरणनीतिक उपयोगिता—या दोन्ही गोष्टीकायम राहतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
- नागपूर: "मी दिलेला निर्णय टिकून राहणार; सिब्बलांचे मत म्हणजे न्यायालयाचे मत नाही" एका विधानामुळे कायदेशीर व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- रत्नागिरी: चिपळूणमधील दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू! मासेमारीसाठी गेलेले दोघे मित्र बुडाले, गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडले मृतदेह
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल


























Subscribe to my channel




