नाशिक: लिव्ह इन रिलेशनशिप 'मध्ये राहणाऱ्या जोडीदाराचा काटा काढण्याचा महिलेने कट रचून प्रियकर व त्याच्या मित्रांच्या मदतीने पाथर्डीफाटा येथे रो-हाऊसमध्ये खून करून मृतदेह थेट कसारा घाटात नेऊन फेकल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १७) उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिचा प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. वसंत गोरखनाथ सातपुते (३९, रा. स्वराज्यनगर, पाथर्डीफाटा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पाथर्डीफाटा परिसरातील स्वराज्यनगर परिसर या घटनेने हादरून गेला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या संशयित आरोपी हसीना हबीब शेख (४४, रा. साई आंगण रो-हाउस) हिने तिचा प्रियकर संशयित साहिल रफिक जुने शहा (२३, रा. घरकुल वसाहत, वडाळा) याच्यासोबत सातपुते याच्या खुनाचा कट रचला.
साहिलने त्याचा साथीदार मोईन मुख्तार शहा (२४, रा. नाईकवाडीपुरा, नाशिक), सरफराज अबरार सय्यद (२२, रा. नानावली, जुने नाशिक) यांच्या मदतीने त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सातपुते याचा ६ ऑगस्ट रोजी पहाटे राहत्या घरात धारदार चाकूने गळा चिरून खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी या चौघांना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली असून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मृताचे दाजी कचरु सखाराम कडवे (४०, रा. मखमलाबाद) यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सातपुते यांच्या पश्चात आई, चार बहिणी, दाजी असा परिवार आहे.
जोडीदार बेपत्ता झाल्याचा महिलेने केला बनाव
६ तारखेला सातपुते यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने साहिल, मोईन, सरफराज यांनी मृतदेह गोणीत टाकून थेट कसारा घाटात नेऊन फेकल्याचे समोर आले. यानंतर संशयित हसिना हिने सातपुते बेपत्ता झाल्याचा बनाव केला होता. फिर्यादी कडवे यांना तिने फोन करून तसे सांगितले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर रविवारी (दि. १६) त्यांनी सातपुते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती.
...असे फुटले बिंग
सातपुते बेपत्ता झाल्याचा बनाव हसिना हिने केला. यासाठी त्यांचे दाजी कडवे यांना तिने फोन करून माहितीही दिली होती. जेव्हा पोलिसांनी हसिनाकडे चौकशी केली, तेव्हा तिचे बोलणे व देहबोली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. यावेळी सातपुते यांच्या खुनाचा कट रचून तो तडीस नेल्याचे बिंग फुटले.
घनदाट जंगलातून शोधला मृतदेह
गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने कसारा घाटातील घनदाट जंगलात जाऊन मृतदेहाचा शोध घेतला. एका गोणीमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेला मृतदेहाचा 'स्पॉट पंचनामा' करत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविला. इंदिरानगर पोलिसांकडून आता पुढील तपास केला जात आहे.
प्रेमसंबंधातील अडसर प्रियकराद्वारे हटविला
सातपुते हे यापूर्वी स्वतःची रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होते. ते हसिनासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. दरम्यान, हसीना आणि साहिल यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या संबंधात सातपुते यांचा अडथळा येऊ लागल्याने त्यांनी दोघांनी साथीदारांच्या मदतीने त्यांचा कायमचा काटा काढला.
शहर
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
महाराष्ट्र
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
गुन्हा
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!























Subscribe to my channel




