पुणे: जिल्ह्यातील मावळ परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. प्रसूतीसाठी तळेगावातील 'मायमर हॉस्पिटल' (Maymar Hospital) मध्ये दाखल करण्यात आलेल्या ३७ वर्षीय महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील निष्काळजीपणाचा आरोप करत नातेवाईकांनी मोठा गदारोळ केला आहे.
मृत महिलेचे नाव रूपाली सोमनाथ इंदलकर (वय ३७, रा. कुसगाव बुद्रुक, ता. मावळ) असे आहे. रूपाली यांना प्रसूतीसाठी मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना आधी रूपाली यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही वेळाने नवजात बाळानेही प्राण सोडले. या घटनेने इंदलकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नातेवाईकांचा आरोप आणि संताप:
महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. "आईचा मृत्यू झाल्यानंतरही रुग्णालयाने तातडीने बाळाला वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत," असा दावा नातेवाईकांनी केला आहे. त्यांच्या मते, संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाल्यानंतरही बाळाला पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यासाठी खूप उशीर करण्यात आला. रात्री नऊ वाजेपर्यंत बाळाला हलवले गेले नाही, ज्यामुळे बाळाचाही जीव गेला. ही स्पष्टपणे रुग्णालयाची फसवणूक आणि हलगर्जीपणा असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. जोपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता.
आमदार सुनील शेळके यांची भूमिका:
घटनेची माहिती मिळताच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी रुग्णालयात धाव घेतली. नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी रुग्णालयावर सडकून टीका केली. "जर केवळ पैशांसाठी आरोग्य सेवा दिली जात असेल, तर असे रुग्णालय बंद पाडण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही," असा इशारा त्यांनी दिला. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषी आढळल्यास 'एसआयटी' (SIT) द्वारे चौकशी लावली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी 'ऑन-कॅमेरा' शवविच्छेदन केले जाणार आहे.
पोलीस आणि प्रशासनाची कार्यवाही:
या प्रकरणावर बोलताना पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी सांगितले की, उपचारांशी संबंधित सर्व कागदपत्रे ससून रुग्णालयाकडे पाठवण्यात येणार आहेत. ससूनमधील तज्ज्ञांची समिती या प्रकरणाची वैद्यकीय तपासणी करेल आणि त्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel





[6663]Tabcorp লগইন এবং অ্যাপ ডাউনলোড – বিকাশ দিয়ে ক্যাসিনো ডিপোজিট,tabcorp-এ লগইন করে অনলাইন স্লট গেম খেলার নিয়ম জানুন এবং সেরা লাইভ ক্যাসিনো বোনাস লুফে নিন। আজই অ্যাপটি ডাউনলোড করে গেম শুরু করুন। visit: tabcorp