सातारा: साहित्यिक हा समाजाचा आरसा असतो आणि त्याचे समाजाप्रती काहीतरी उत्तरदायित्व असते, या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत 'पानिपत'कार आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, साहित्यिक राजीव श्रीखंडे आणि त्यांच्या काही साहित्यिक मित्रांनी एक अत्यंत स्तुत्य आणि आदर्श असा उपक्रम हाती घेतला आहे. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना संशयास्पद मृत्यू झालेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या दुःखी कुटुंबाला या साहित्यिकांनी मदतीचा मोठा हातभार लावला आहे. डॉ. संपदा मुंडे यांच्या वडिलांनी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची संपूर्ण रक्कम या साहित्यिकांनी एकत्र येऊन भरली आहे, ज्यामुळे वृद्ध वडिलांच्या डोक्यावरील मोठा आर्थिक ताण दूर झाला आहे.
काही महिन्यांपूर्वी फलटण येथे घडलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. या दुर्दैवी घटनेनंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले आणि मोठी चर्चा रंगली. मूळच्या बीड जिल्ह्यातील असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या वडिलांनी अत्यंत हलाकीच्या आणि कष्टमय परिस्थितीमध्ये आपल्या मुलीला वैद्यकीय शिक्षण दिले होते. यासाठी त्यांनी एका बँकेतून मोठे शैक्षणिक कर्ज काढले होते. मात्र, अचानक ओढवलेल्या या आघातामुळे आणि तरुण मुलगी गमावल्यामुळे दुःखात असलेल्या तिच्या वडिलांसमोर हे मोठे बँक कर्ज कसे फेडायचे, असा अत्यंत गंभीर व पेसाचा प्रश्न उभा ठाकला होता.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील हे एका व्याख्यानाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात गेले होते. त्या दौऱ्यादरम्यान त्यांनी मृत डॉ. संपदा मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केले. या भेटीत त्यांनी कुटुंबाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली, तेव्हा मुलीच्या शिक्षणासाठी वडिलांनी काढलेले कर्ज तसेच असल्याचे आणि ते फेडण्यासाठी त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या गोष्टीची गंभीर दखल घेऊन लेखक विश्वास पाटील यांनी साहित्यिक राजीव श्रीखंडे यांच्यासह इतर काही सुहृद साहित्यिक मित्रांशी सविस्तर चर्चा केली. या सर्व सहकाऱ्यांनी मिळून स्वेच्छेने मदतीचा हात पुढे करण्याचे ठरवले आणि इतर मित्र-परिवारालाही मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला सर्वच स्तरातून आणि साहित्यिकांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या सर्व १० ते १२ साहित्यिकांनी मिळून केलेल्या सामूहिक आर्थिक सहकार्यातून १७ ऑगस्ट रोजी बँकेच्या संबंधित शाखेत जाऊन कर्जाच्या संपूर्ण रकमेचा भरणा करण्यात आला व ते कर्ज पूर्णपणे फेडण्यात आले. विशेष म्हणजे, ही मदत केल्यानंतर कोणतीही प्रसिद्धी न घेता अत्यंत निस्वार्थ भावनेने हा सामाजिक ओलावा जपण्यात आला आहे, ज्यामुळे साहित्य वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये या निर्णयाचे अत्यंत कौतुक होत आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel





[5663]betinasia login করুন – বিকাশ দিয়ে অনলাইন স্লট গেম খেলুন,betinasia app download করে লাইভ ক্যাসিনো খেলার নিয়ম জানুন এবং বিকাশ দিয়ে ক্যাসিনো ডিপোজিট করে আজই গেম শুরু করুন। visit: betinasia