अयोध्या: अतिशय संवेदनशील आणि देशभरात चर्चेत असलेल्या राम मंदिरातील देणगी व चंदा चोरी प्रकरणात एक मोठा आणि महत्त्वपूर्ण खुलासा समोर आला आहे. उत्तर प्रदेश गृह विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या विशेष पथकाचा (SIT) अंतिम अहवाल श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द केला आहे. या एसआयटीच्या अंतिम अहवालात श्री रामजन्मभूमी मंदिराचे माजी सरचिटणीस चंपत राय आणि माजी विश्वस्त अनिल मिश्रा यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना या प्रकरणातून क्लीन चिट मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.
या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, राम मंदिरातील देणगी आणि चढ़ाव्यामध्ये अफरातफर व चोरी झाल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने १३ जून रोजी लखनौचे मंडलायुक्त विजय विश्वास पंत यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय उच्चस्तरीय एसआयटी (SIT) स्थापन केली होती. या समितीत आयजी रेंज किरण एस. आणि विशेष सचिव (वित्त) नील रतन कुमार यांचा सदस्य म्हणून समावेश होता. या पथकाने आपला प्राथमिक अहवाल २३ जून रोजी शासन दरबारी सादर केला होता.
प्राथमिक अहवालातील शिफारसी आणि पुराव्यांच्या आधारावर २५ जून रोजी श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्यात अधिकृतपणे पहिली फिर्याद नोंदवली गेली. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणात एकूण ८ जणांना अटक करण्यात आली होती. अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पाण्डेय, रमाशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव आणि राम शंकर यादव ऊर्फ टिन्नू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या (Prevention of Corruption Act) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चौकशीदरम्यान एसआयटीने चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचीही कसून चौकशी केली होती. चौकशीत चंपत राय यांनी स्वतःहून या प्रकरणाची तक्रार दाखल केली असल्याचे सांगत, देणगी संग्रहात पारदर्शकता राखणे ही आपली जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले होते. अनियमितता उघडकीस आल्यानंतर त्यांनी तातडीने पावले उचलल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर २७ जून रोजी या वादाच्या पार्श्वभूमीवर चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते, जे नंतर ट्रस्टच्या बैठकीत मंजूर करण्यात आले होते.
आता एसआयटीने आपला अंतिम अहवाल अधिकृतपणे ट्रस्टकडे सुपूर्द केल्यानंतर, अंतर्गत प्रोटोकॉल आणि व्यवहारांची छाननी करून चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना या प्रकरणातील आरोपांमधून मुक्त करण्यात आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या अहवालानंतर राम मंदिर ट्रस्ट आणि प्रशासकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले असून, यावर ट्रस्ट आगामी बैठकीत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




