सोलापूर शहरातील बॉम्बे पार्कजवळील गणेश बिल्डर स्कीम क्रमांक तीनमधील सुमारे सातशे नागरिकांच्या ये-जा करण्याचा एकमेव रस्ता खोदून पूर्णपणे बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या मनमानी कारभाराविरोधात संतप्त नागरिकांनी थेट खोदलेल्या रस्त्यातील खड्ड्यातच बसून ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही प्रत्यक्ष सहभाग नोंदवत प्रशासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला. गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसह शेकडो रहिवासी रस्त्याच्या खड्ड्यात आंदोलनासाठी बसल्यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बॉम्बे पार्क परिसरातील या वसाहतीत सुमारे ७०० ते ८०० नागरिक वास्तव्य करतात. या नागरिकांना बॉम्बे पार्क रस्त्याला जोडणारा केवळ एकच वहिवाटीचा रस्ता होता. मात्र, लगतच्या लेआउटधारकाने किंवा बांधकाम व्यावसायिकाने हा उरलासुरला रस्ताही खोदून टाकल्यामुळे नागरिकांची ये-जा पूर्णपणे बंद झाली. यापूर्वीही या रस्त्याच्या प्रश्नासंदर्भातील वादात नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता, तेव्हा प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय, सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. निता जोशी यांनी या प्रकरणी न्यायालयातही धाव घेतली होती. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही बाजूच्या बांधकामधारकाने मनमानी करत रस्ता खोदून वाट बंद केल्यामुळे नागरिकांचा संयम सुटला.
घटनास्थळावर झोनल अधिकारी किंवा स्थानिक नगरसेवक यापैकी कोणीही जबाबदार प्रतिनिधी न आल्याने आंदोलक अधिक आक्रमक झाले. तब्बल चार तास चाललेल्या या आंदोलनाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाहणीसाठी पाठवले. अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, नागरिकांनी त्यांना पूर्ण खोदून टाकलेला रस्ता दाखवला, ज्यामुळे अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना रस्ता कसा खोदला गेला, याचे उत्तर प्रशासन देऊ शकले नाही. अखेरीस, रात्री उशिरा महापालिकेने तीन जेसीबीच्या साहाय्याने तात्पुरत्या स्वरूपात वहिवाटीसाठी रस्ता मोकळा करून दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शहर
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
महाराष्ट्र
- गोवा: ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेता अश्विन मुशरनच्या कारने बाप-लेकाला उडवले; गोव्यातील अपघातानंतर मदतीऐवजी स्थानिकांसोबत घातला वाद
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- बीड: पहिल्या श्रावण सोमवारी व नागपंचमीच्या दुर्मिळ योगावर परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ३ हजार किलो फुलांची सजावट
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू



























Subscribe to my channel




