पश्चिम बंगाल: तारापीठमधील हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा मृत्यू, शॉर्ट सर्किटचा संशय

पश्चिम बंगाल: एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली आहे. आगीत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे ४:३० च्या सुमारास 'बिदिशिनी' नावाच्या या हॉटेलच्या तळमजल्यावर आग लागली. हे हॉटेल तारापीठ पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं.

श्रावणी सोमवार असल्याने हॉटेल भाविक पर्यटकांनी खचाखच भरलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल कर्मचाऱ्यांनी पहाटे तळमजल्यावर आगीच्या ज्वाळा पाहिल्या आणि ते मदतीसाठी ओरडू लागले. परंतु मदत मिळेपर्यंत आग संपूर्ण हॉटेलच्या इमारतीत पसरली होती. हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबरचं साहित्य असल्याने आग अधिक वेगाने पसरल्याचं समोर आलं आहे.

 

 

आगीत ७ जणांना गमवावा लागला जीव
हॉटेल पोलीस ठाण्याला लागूनच असल्याने पोलीस आणि अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वेगाने बचावकार्य सुरू करून आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र या आगीत ७ जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये काही पर्यटक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. काहींचा मृत्यू होरपळून झाला, तर अनेकांचा गुदमरून श्वास कोंडल्याने मृत्यू झाला. हॉटेलमधून १० ते १५ जणांना सुखरूप बाहेर काढून तातडीने 'रामपूरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल'मध्ये दाखल करण्यात आले आहे.


"दरवाजा उघडताच समोर भीषण आग"
तारापीठ येथे दर्शनासाठी आलेले आणि हॉटेलमध्ये उतरलेले एक पर्यटक म्हणाले, "पहाटे ४ वाजता बाहेर मोठा आवाज झाला. आम्ही रिसेप्शनच्या उजव्या बाजूला असलेल्या खोली क्रमांक दोनमध्ये होतो, तर माझी आई आणि बहीण खोली क्रमांक एकमध्ये होत्या. मी बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडताच समोर भीषण आग दिसली. आम्ही घाबरून किंचाळलो."

"४५ मिनिटं तिथेच अडकून पडलो"
"आम्ही लगेच दरवाजा बंद केला. खोलीला खिडक्या नव्हत्या. त्यामुळे आम्ही बाथरूममध्ये गेलो आणि तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. माझी पत्नी, दोन मुलं आणि मी सुमारे ४५ मिनिटं तिथेच अडकून पडलो होतो. समोर मृत्यू दिसत होता. मी वारंवार तारापीठ पोलीस ठाण्यात फोन केला. पोलिसांनी तातडीने येऊन दरवाजा तोडला आणि आमची सुटका केली."



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *