
Satara : भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानाचे साताऱ्यात अपघातामध्ये निधन झालेय. पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला होता, पण काळाने घाला घातला. साताऱ्यातील दरे गावावर शोककळा पसरली आहे. प्रमोद परशुराम जाधव असे अपघाती निधन झालेल्या जवानाचे नाव आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लेकीचा जन्म होण्याआधी काही तास प्रमोद परशुराम जाधव यांचं निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काही तासापूर्वीच जन्मलेल्या बालिकेने घेतले आपल्या पित्याचे अंत्यदर्शन घेतले. हा क्षण प्रत्येकाचे काळीज चिरणारा ठरला.
सिकंदराबाद श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानाचा साताऱ्यामध्ये अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सातारा तालुक्यातील दरे या गावचे प्रमोद परशुराम जाधव असे जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील त्यांची पत्नी आणि नवजात बालक (मुलगी) असा परिवार आहे.
|
Pune : पुण्यात मुळा नदीवर नवा पूल; दोन शहरांना थेट जोडणी, वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा |
वीर जवान प्रमोद यांना आई नसल्यामुळे पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आठ दिवसापूर्वी सुट्टीवर गावी आले होते. यादरम्यान काही कामानिमित्त वाढे फाटा येथे दुचाकीवर जात असताना पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात जागीच मृत्यू झाला. यामुळे दरे गावासह परळी खोऱ्यात शोककळा पसरली.
आज सकाळी प्रमोद यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. या दरम्यानच त्यांच्या पत्नीने लहान मुलीला जन्म दिला. वीर जवान प्रमोद यांची अंत्ययात्रा अंत्य विधीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर वीर जवान प्रमोद यांची पत्नी आणि लहान बाळाला अंत्यविधीच्या ठिकाणी अंतदर्शनासाठी आणण्यात आले. हा क्षण पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले... आज दुपारच्या सुमारास त्यांच्यावर शासकीय ईतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel





1 thought on “Satara : दुर्दैवी! भारतीय जवानाचा लेकीच्या जन्माआधीच मृत्यू, पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आला होता सुट्टीवर, सातारा शोकसागरात”